आयपीएल 2024 च्या 10 व्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा 21 धावांनी पराभव केला. लखनौने पंजाबसमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पंजाबचा संघ चांगल्या सुरूवातीनंतर ही 178 धावांपर्यंतच मजल मारू शकला. लखनौकडून मयंक यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने 70 धावांची खेळी केली.
लखनौचे 200 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबने 11 षटकात 102 धावांची दमदार सलामी दिली. शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टोने धडाकेबाज फलंदाजी केली. बेअरस्टोने 42 धावांची खेळी केली. तर शिखरने 50 चेंडूत 70 धावा केल्या.
मात्र त्यानंतर आयपीएल पदार्पण सरणाऱ्या मयंक यादव अन् मोहसीन खान यांनी पंजाबला धक्क्यावर धक्के दिले. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मयंक यादवने आपल्या वेगाने लखनौच्या भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवली. त्याने 4 षटकात 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर मोहसीन खानने 33 धावात 2 विकेट्स घेत पंजाबची अवस्था 17 व्या षटकात 5 बाद 141 धावा अशी केली.
त्यानंतर लिम लिव्हिंगस्टोनने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पंजाबला 20 षटकात 178 धावांपर्यंतच मजल मारता आली. लखनौ सुपर जायंट्सने सामना 21 धावांनी जिंकला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जविरूद्ध 20 षटकात 8 बाद 199 धावा केल्या. लखनौकडून सलामीवीर क्विंटन डिकॉकने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार निकोलस पूरनने 21 चेंडूत 42 धावा ठोकल्या.
कृणाल पांड्याने आक्रमक फलंदाजी करत 22 चेंडूत 43 धावा केल्या. यामुळे लखनौने 20 षटकात 199 धावा केल्या. ही त्यांची आयपीएलमधील या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या आहे. पंजाबकडून सॅम करनने 3 तर अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या.
दमदार सुरूवातीनंतर पंजाब किंग्जच्या मधल्या फळीला मयंक यादव अन् मोहसीन खान यांनी धक्क्यावर धक्के दिले. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मयंक यादवने आपल्या वेगाने लखनौच्या भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवली. त्याने 4 षटकात 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर मोहसीन खानने 33 धावात 2 विकेट्स घेत पंजाबची अवस्था 17 व्या षटकात 5 बाद 141 धावा अशी केली.
पंजाब किंग्जने लखनौस सुपर जायंट्सच्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरूवात केली. शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी 11 षटकात 102 धावांची सलामी दिली. बेअरस्टो 42 धावांवर बाद झाला तर धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर प्रभसिमरनने धडाकेबाज फलंदाजी करत संघाला 14 व्या षटकात 130 धावांपर्यंत पोहचवले.
निकोलस पूरन बाद झाल्यावर कृणाल पांड्याने 22 चेंडूत 44 धावा ठोकत लखनौला 20 षटकात 8 बाद 199 धावांपर्यंत पोहचवले. लखनौची आयपीएलमधील ही अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवरील सर्वाधिक धावसंख्या आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर क्विंटन डिकॉकने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला कर्णधार पूरनने 25 धावा करून चांगली साथ दिली होती. या दोघांनी लखनौला 14 व्या षटकात 125 धावांपर्यंत पोहचवलं होतं. मात्र अर्शदीपने डिकॉकला बाद करत लखनौला मोठा धक्का दिला.
क्विंटन डिकॉकने दमदार फलंदाजी करत लखनौला दोन धक्क्यानंतर चांगले सावरले. डिकॉक आणि मार्कस स्टॉयनिस यांनी 78 धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र स्टॉयनिस 19 धावा करून बाद झाला.
लखनौ सुपर जायंट्सला सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. त्याच्या ऐवजी निकोलस पूरन नाणेफेकीसाठी मैदानावर आला. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर निकोलसने सांगितले की केएल राहुल हा आजच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. तो नुकताच दुखापतीतून सावरला असून त्याला थोडी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.