LSG vs RCB IPL 2023: चिन्नास्वामीच्या पराभवाचा घेतला बदला! बंगळुरूने लखनौचा केला 18 धावांनी पराभव
LSG vs RCB Score : आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. लखनौच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 9 गडी गमावून 126 धावा केल्या. लखनौचा संघ 20 षटकांत नऊ गडी गमावून 108 धावाच करू शकला. बंगळुरूने लखनौचा 18 धावांनी पराभव केला.
LSG vs RCB Score : लखनौला सातवा धक्का! कृष्णप्पा गौतम धावबाद
लखनौला 38 धावांवर पाचवा धक्का! शर्माने पूरनला पाठवले पॅव्हेलियनमध्ये
लखनौला सातव्या षटकात 38 धावांवर पाचवा धक्का बसला. करण शर्माने निकोलस पूरनला झेलबाद केले. त्याला सात चेंडूंत नऊ धावा करता आल्या.
नऊ षटकांनंतर लखनौची धावसंख्या पाच गडी बाद 53 अशी आहे. सध्या कृष्णप्पा गौतम 13 आणि मार्कस स्टोइनिस 10 धावा करून क्रीजवर आहेत.
लखनौला 66 चेंडूत 74 धावा हव्या आहेत.
आरसीबीच्या गोलंदाजांचा 'बोलबाला', लखनौला धक्क्यावर धक्के!
लखनौला सहाव्या षटकात चौथा धक्का बसला आहे. वानिंदू हसरंगाने दीपक हुड्डाला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककरवी यष्टिचित केले. दीपकला एक धाव करता आली.
लखनौने गमावली तिसरी विकेट! आयुष बडोनीही तंबूत
जोश हेजलवूडने पाचव्या षटकात आयुष बडोनीला झेलबाद केले. बडोनी चार धावा करू शकला. पाच षटकांनंतर बंगळुरूची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा आहे.
लखनौची पडली दुसरी विकेट...
लखनौची दुसरी विकेटही पडली आहे. चौथ्या षटकात कृणाल पांड्या (14) ग्लेन मॅक्सवेलने बाद केले.
पहिल्याच षटकात लखनौला धक्का! काईल मेयर्स तंबूत
लखनौला डावाच्या दुसऱ्या चेंडूवर शून्यावर पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजने काइल मेयर्सला झेलबाद केले. मेयर्सला खातेही उघडता आले नाही.
LSG vs RCB Live Score : शेवटच्या चेंडूवर चौकार अन् आरसीबीने 20 षटकात केल्या 126 धावा
बंगळुरूने लखनौसमोर 127 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूची सुरुवात दमदार झाली होती.
कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रवी बिश्नोईने मोडली. त्याने विराट कोहलीला यष्टिरक्षक निकोलस पूरनकडून यष्टिचित केले.
कोहलीने 30 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या.
पाऊस थांबला अन् आरसीबी कर्णधार फाफ डुप्लेसी झाला आऊट, अर्धशतक हुकले
17 षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच गडी गमावून 110 धावा केल्या आहेत. या षटकात अमित मिश्राने कर्णधार फाफ डुप्लेसिसला झेलबाद केले. त्याला 40 चेंडूत 44 धावा करता आल्या. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला.
पाऊस थांबला सामना झाला सुरू! आरसीबी संकटात, डुप्लेसिस-कार्तिक क्रीजवर
पाऊस थांबला आहे. सामना पुन्हा सुरू झाला आहे. फाफ डुप्लेसिस आणि दिनेश कार्तिक फलंदाजी करत आहेत.
LSG vs RCB Live Score : पावसामुळे खेळ थांबला! आरसीबी मोठ्या संकटात
लखनौमध्ये पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. पावसामुळे सामना थांबला तोपर्यंत बंगळुरूने 15.2 षटकांत चार गडी गमावून 93 धावा केल्या होत्या. सध्या दिनेश कार्तिक तीन चेंडूत एका धावेवर तर कर्णधार फाफ डुप्लेसिस 36 चेंडूत 40 धावांवर फलंदाजी करत आहे.
विराट कोहली 30 चेंडूत 31 धावा, अनुज रावत 11 चेंडूत नऊ धावा, ग्लेन मॅक्सवेल पाच चेंडूत चार धावा आणि सुयश प्रभुदेसाई सात चेंडूत सहा धावा करून बाद झाला.
रवी बिश्नोईने दोन गडी बाद केले. त्याचवेळी अमित मिश्रा आणि कृष्णप्पा गौतम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
बंगळुरूला चौथा धक्का
15 व्या षटकात 90 धावांवर बेंगळुरूला चौथा धक्का बसला आहे. अमित मिश्राने सुयश प्रभुदेसाईला कृष्णप्पा गौतमकरवी झेलबाद केले. त्याला सात चेंडूंत सहा धावा करता आल्या. सध्या कर्णधार डुप्लेसिस 39 आणि दिनेश कार्तिक 1 धावा करत क्रीजवर आहे. बेंगळुरूची धावसंख्या 15 षटकांत 4 बाद 93 अशी आहे.
LSG vs RCB Live Score : लखनौने आरसीबीला दिले धक्क्यावर धक्के! विराट कोहलीनंतर ग्लेन मॅक्सवेल तंबूत
बंगळुरूला 13व्या षटकात 80 धावांवर तिसरा धक्का बसला. ग्लेन मॅक्सवेल पाच चेंडूत चार धावा करून बाद झाला. त्याला रवी बिश्नोईने एलबीडब्ल्यू आऊट केले. रवीचे हे दुसरे यश होते. यापूर्वी त्याने कोहलीला बाद केले होते. सध्या कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि सुयश प्रभुदेसाई क्रीजवर आहेत. बंगळुरूची धावसंख्या 13 षटकांनंतर 3 बाद 82 अशी आहे.
LSG vs RCB Live Score : नवव्या षटकात आरसीबीला मोठा धक्का! विराट कोहली तंबूत
रवी बिश्नोई बंगळुरूला पहिला धक्का दिला आहे. विराट कोहली 31 धावा करून बाद झाला.
सहा षटकांनंतर बंगळुरूने केल्या 42 धावा! विराट-डुप्लेसिस क्रीजवर
सहा षटकांनंतर बंगळुरूने एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या आहेत. विराट कोहली 19 चेंडूत 21 धावा तर फाफ डुप्लेसिस 17 चेंडूत 21 धावा करत फलंदाजी करत आहे.
जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, निकोलस पूरन, दीपक हुडा, कृणाल पंड्या, नवीन उल हक, रवी बिश्नोई, कृष्णप्पा गौतम, यश ठाकूर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डुप्लेसिस, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, जोश हेझलवूड, वानिंदू हसरंगा, विजयकुमार वैशाक, मोहम्मद सिराज.
LSG vs RCB Live Score : बंगळुरूने लखनौविरुद्ध जिंकले नाणेफेक! डुप्लेसिसने घेतला 'हा' निर्णय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. फॅफ डु प्लेसिस कर्णधार म्हणून परतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.