PBKS vs LSG : पंजाबचा पराभव करत लखनौची प्ले ऑफच्या दिशेने कूच

Lucknow Super Giants Defeat Punjab Kings
Lucknow Super Giants Defeat Punjab KingsESAKAL
Updated on

पुणे : लखनौ सुपर जायंटने (Lucknow Super Giants) पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 20 धावांनी पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. लखनौ सुपर जांयटने पंजाब किंग्ज समोर 154 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पंजाबला 133 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून बेअरस्टोने सर्वाधिक 32 धावा केल्या. लखनौ सुपर जायंटकडून मोहसीन खानने 3 तर क्रुणाल पांड्या 2 दुष्मंथा चमीराने 2 विकेट घेतल्या. लखनौ सुपर जायंटकडून क्विंटन डिकॉकने सर्वाधिक 46 धावा केल्या. पंजाब कडून कसिगो रबाडाने 38 धावात 4 विकेट घेत लखनौला 153 धावात रोखले. त्याला राहुल चहरने 30 धावात 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.

Lucknow Super Giants Defeat Punjab Kings
संपत्ती लपवणं आलं अंगलट; माजी टेनिसपटूला तुरुंगवास

लखनौ सुपर जांयटने ठेवलेल्या 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची देखील सुरूवात खराब झाली. त्यांचा कर्णधार मयांक अग्रवाल 25 धावांची भर घालून परतला. त्याला चमीराने बाद केले. त्यानंतर रवी बिश्नोईने संथ फलंदाजी करणाऱ्या शिखर धवनला बाद करत पंजाबला अजून एक धक्का दिला.

या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच क्रुणाल पांड्याने भानुका राजपक्षेला 9 धावांवर बाद केले. यानंतर जॉनी बेअरस्टो आणि लिम लिव्हिंगस्टोनने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. या दोघांची भागीदारी 30 धावांपर्यंत पोहचली असतानाच मोहसीन खानने जोडी फोडली. त्याने लिव्हिंगस्टोनला 17 धावांवर बाद केले.

लिव्हिंगस्टोन बाद झाल्यानंतर जितेश शर्मा देखील 2 धावांची भर घालून माघारी परतला. त्यानंतर बेअरस्टोने कसे बसे पंजाबला शतक पार करून दिली. मात्र त्यानंतर चमीराने बेअरस्टोला 32 धावांवर बाद करत सेट फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडला. यानंतर आलेल्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. अखेर पंजाबने 20 षटकात 8 बाद 133 धावांपर्यंतच मजल मारली.

Lucknow Super Giants Defeat Punjab Kings
'हा' अनसोल्ड खेळाडू कॉमेंटरी बॉक्समधून थेट मुंबईच्या ताफ्यात दाखल

प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण करण्यात आलेल्या लखनौ सुपर जायंटची सुरूवात खराब झाली. रबाडाने लखनौचा कर्णधार केएल राहुलला 6 धावांवर बाद करत लखनौला पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि प्रमोशन मिळालेल्या दीपक हुड्डाने सावध फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी रचत डाव सावरला. क्विंटन डिकॉक अर्धशतकाजवळ पोहचला होता. मात्र त्याला संदीप शर्माने 46 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

यानंतर दीपक हुड्डा देखील 34 धावा करून धावबाद झाला. दरम्यान, कसिगो रबाडाने 15 व्या षटकात क्रुणाल पांड्या (7) आणि आयुष बदोनी (4) यांना बाद करत लखनौची अवस्था 5 बाद 109 धावा केली. रबाडानंतर राहुल चहरने कहर करत धोकादायक मार्कस स्टॉयनिस (1) आणि जेसन होल्डर (11) यांची शिकार केली. दरम्यान, स्लॉग ओव्हरमध्ये चमिरा आणि मोहसीन खान यांनी थोडीफार फटकेबाजी करत संघाला 150 च्या जवळ पोहचवले. मात्र चमीराची 10 चेंडूत केलेली 17 धावांची खेळी रबाडाने संपुष्टात आणली. अखेर लखनौ सुपर जायंटचा डाव 20 षटकात 8 बाद 153 धावांवर संपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.