Lucknow Super Giants Explanation On KL Rahul Sanjiv Goenka Controversy IPL 2024 : अखेर लखनौ सुपर जायंट्सने मालक संजीव गोयंका आणि केएल राहुल यांचा हैदराबादविरूद्धच्या सामन्यानंतर भर मैदानात झालेल्या वादावर स्पष्टकीरण दिलं आहे. त्यांनी ही काही फार महत्वाची गोष्ट नसल्याचं सांगत सर्व चर्चांना विराम देण्याचा प्रयत्न केला. लखनौ सुपर जायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुजनरने दोन क्रिकेट चाहत्यांमधील एक गहन चर्चा असं म्हणत या संपूर्ण प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
लान्स क्लुजनरने आज पत्रकार परिषदेत बोलताना संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यातील जे संभाषण झालं ते फक्त चहाच्या कपातलं वादळ असल्याचं सांगितलं. या संभाषणानंतर सोशल मीडियावर याची तुफान चर्चा झाली होती. संजीव यांनी केएलला चांगली वागणूक दिली नसल्याचं नेटकऱ्यांच आणि जाणकारांच म्हणणं होतं.
केएल राहुल या सर्व प्रकारानंतर लखनौचं कर्णधरापदही भुषवणार नाही अशी चर्चा सुरू झाली होती. यावर क्लुजनर म्हणाला की, 'याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. दोन क्रिकेट प्रेमींमध्ये गंभीर चर्चा होणं यात मला काही गैर वाटत नाही. मला वाटतं की सध्या हा वाद म्हणजे चहाच्या कपातील वादळ आहे.'
तो पुढे म्हणाला की, 'आम्हाला गंभीर चर्चा केलेली आवडते. यामुळे संघाचं भलंच होत असतं. त्यामुळे हे काही मोठी गोष्ट नाही.'
लखनौ सुपर जायंट्स व दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये उद्या आयपीएल लढत रंगणार आहे. प्ले ऑफच्या दृष्टिने ही लढत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही संघांसमोर आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी सामना जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दिल्लीचा हा शेवटचा सामना आहे. तर या सामन्यानंतर लखनौच्या हातात अजून एक सामना असणार आहे.
पॉईंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचे देखील 12 सामन्यात 13 गुण झाले आहेत. दिल्लीसाठी करो या मरोची स्थिती आहे. तर लखनौला सेफ झोनमध्ये जाण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.