KL Rahul T20 WC 2024 : इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायजी लखनौ सुपर जायंट्सने आपल्या कर्णधारासाठी एक क्रिप्टिक पोस्ट केली आहे. भारताचा टी 20 वर्ल्डकप संघ घोषित झाल्यानंतर ही पोस्ट करण्यात आली. निवडसमितीने केएल राहुलचा टी20 वर्ल्डकप संघात स्थान दिले नाही. केएल राहुल आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतोय मात्र बीसीसीआयने पर्यायी विकेटकिपर म्हणून संजू सॅमसनची निवड केली आहे.
यानंतर लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. एलएसजीने ट्विट केले की 'शुन्य दिवसांपासून आमचा नंबर एकचा खेळाडू' या क्रिप्टिक ट्विटनंतर चर्चांना उधाण आलं आहे.
टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. हार्दिक पांड्या हा संघाचा उपकर्णधार असणार आहे. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. मात्र तरी देखील त्याची संघात निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघाने फक्त तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांचा संघात समावेश आहे. तर हार्दिक पांड्या देखील या वेगवान गोलंदाजांना हातभार लावणार आहे.
फिरकीपटूंमध्ये युझवेंद्र चहलने संघात पुनरागमन केलं आहे. त्याने आयपीएलमध्ये दमदार गोलंदाजी केली आहे. आता भारतीय संघात पुन्हा एकदा कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची कुलचा जोडी दिसणार आहेत.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडीजच्या फिरकीला पोषक खेळपट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर या दोघांची निवड करण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.