मुंबईच्या गोलंदाजांनी चांगला मारा करत लखनौची अवस्था 5 बाद 123 धावा अशी केली आहे. लखनौला विजयासाठी 17 चेंडूत 22 धावांची गरज आहे.
मुंबईचे 145 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लखनौने पहिल्या धक्क्यानंतर चांगली फलंदाजी केली. केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी 59 धावांची भागीदारी रचली. केएल 28 धावा करून बाद झाल्यानंतर मार्कस आणि दीपक हुड्डा यांनी लखनौला 11 षटकात 88 धावा केल्या आहेत.
नेहल वढेराने 46 धावांची झुंजार खेळी करत मुंबईचा डाव सावरला. त्यानंतर टीम डेव्हिडने स्लॉग ऑव्हरमध्ये 18 चेंडूत 35 धावा करून मुंबईला 20 षटकात 7 बाद 144 धावा केल्या.
मुंबईचे चार फलंदाज बाद झाल्यानंतर सलामीवीर इशान किशन आणि नेहल वढेराने डाव सावरत मुंबईला 100 च्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला.
लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी मुंबईची टॉप ऑर्डर उडवली. मुंबईची अवस्था 4 बाद 27 धावा अशी झाली.
मोहसीन खानने रोहित शर्माला 4 धावांवर केले बाद
लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत 4 सामने झाले आहेत. त्यातील तीन सामने लखनौने तर एक सामना मुंबईने जिंकला आहे. मुंबईनं गेल्या हंगामात लखनौला इलिमनेटर सामन्यात पराभव केला होता.
लखनौ सुपर जायंट्सनं मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सनी पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. लखनौने मुंबईचे 145 धावांचे आव्हान 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 19.2 षटकात पार केलं. लखनौकडून स्टॉयनिसने 65 धावा केल्या तर निकोलस पूरननं 14 चेंडूत 14 धावा करत लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबईकडून हार्दिक पांड्यानं 2 विकेट्स घेत लखनौचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र लखनौनं सामना हातून निसटू दिला नाही.
मुंबई इंडियन्सने खराब सुरूवातीनंतर जोरदार पुनरागमन करत लखनौ सुपर जायंट्समोर 145 धावांचे ठेवले आहे. मुंबईकडून नेहल वढेराने 46 धावांची खेळी केली तर टीम डेव्हिडने 18 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. सलामीवीर इशान किशननेही 36 चेंडूत 32 धावा करत नेहलसोबत पाचव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी रचली.
लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी करत मुंबईची अवस्था 4 बाद 27 धावा अशी केली होती. मात्र त्यानंतर इशान किशन आणि नेहलने 53 धावांची भागीदारी रचत मुंबईला 80 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र इशान किशन 32 धावा करून बाद झाला.
त्यानंतर नेहलनं संघाचं शतक धावफलकावर लावलं. मात्र त्याला आपलं अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. तो 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर टीम डेव्हिडने शेवटच्या काही षटकात आक्रमक फलंदाजी करत 18 चेंडूत 35 धावा चोपल्या. यामुळे मुंबई इंडियन्स 150 धावांच्या जवळ जाऊ शकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.