LSG vs SRH IPL 2023 : लखनौ सुपर जायंट्सचा होम ग्राऊंडवर सलग दुसरा विजय, हैदराबादचा केला 5 विकेट्स राखून पराभव

LSG vs SRH IPL 2023 Live
LSG vs SRH IPL 2023 Liveesakal
Updated on

LSG vs SRH IPL 2023 Live : लखनौ सुपर जायंट्सने आपल्या घरच्या मैदानावर सनराईजर्स हैदराबादचा 5 विकेट्सनी पराभव करत आपला सलग दुसरा विजय मिळवला. तर सनराईजर्स हैदराबादचा सलग दुसरा पराभव झाल्याने त्यांना गुणतालिकेत अजूनही तळातच रहावे लागणार आहे.

लखनौने प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला 121 धावात रोखले होते. त्यानंतर विजयासाठी 122 धावांचे आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 15 षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. यात केएल राहुलने 35 तर कृणाल पांड्याने 34 धावांचे योगदान दिले.

लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू कृणाल पांड्याने गोलंदाजीत 4 षटकात 18 धावा देत 3 बळी टिपले. त्याला अमित मिश्राने 2 तर रवी बिश्नोई आणि यश ठाकूरने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

121-8 (20 Ov) : लखनौने हैदराबादला 121 धावात गुंडाळले. 

77-4 (14.2 Ov) : राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदरने डाव सावरला

रवी बिश्नोईने हॅरी ब्रुक्सला 3 धावांवर बाद केल्यानंतर राहुल त्रिपाठी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी लखनौच्या फिरकीचा सामना करत हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी सावध भागीदारी रचण्यास सुरूवात केली.

50-3 : कृणाल पांड्याचा डबल धमाका

कृणाल पांड्याने 26 चेंडूत 31 धावा करणाऱ्या अनमोलप्रीतला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. यानंतर कर्णधार एडिन मारक्रमला पुढच्याच चेंडूवर बोल्ड करत विकेटचा डबल धमका केला.

44-1 (6.1 Ov) : हैदराबादची चांगली सुरूवात 

हैदराबादचा सलामीवीर मयांक अग्रवाल 8 धावांची भर घालून बाद झाला. त्यानंतर अनमोलप्रीतने आक्रमक फटकेबाजी केली. त्याला राहुल त्रिपाठीने देखील साथ दिली.

नाणेफेक जिंकून हैदराबादची बॅटिंग 

सनराईजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.