Water Crisis IPL : दुष्काळात IPL सुरू होतं अन् रूग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द होत होत्या... अखेर हाय कोर्टानं दिला होता दणका

Water Crisis IPL 2016 : क्रिकेट संघटनांनी उच्च न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने लागावा यासाठी अनेक युक्तीवाद केले मात्र...
ipl drought
ipl drought esakal
Updated on

Water Crisis IPL Mumbai High Court Decision : यंदा भारतभर पावसाचे प्रमाण तसं कमीच होतं. त्यामुळे देशाच्या अनेक भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता दाट होती. याचे परिणाम मार्च महिन्यात जाणवू लागले आहेत. आयटी हब असलेलं अन् कर्नाटकची राजधानीचं शहर बंगळुरूमध्ये मार्चच्या सुरूवातीलाच भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशने तातडीची बैठक बोलावली आहे.

आरसीबीचे होम ग्राऊंड चिन्नास्वीमी स्टेडियम हे बंगळुरूमध्येच आहे. त्यामुळे आयपीएलच्या काही सामन्यावर देखील या पाणी टंचाईचा परिणाम होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने तातडीची बैठक बोलावली. या बैठकीच्या बातमीनंतर महाराष्ट्रातील 2016 च्या परिस्थितीची आठवण सर्वांना झाली.

ipl drought
Rishabh Pant T20 World Cup : जर तो विकेटकिपिंग करू लागला तर... जय शहा ऋषभ पंतच्या टी 20 वर्ल्डकप खेळण्याबद्दल काय म्हणाले?

2016 ला देखील आयपीएलचा 13 वा हंगाम आणि महाराष्ट्रातील दुष्काळ हा चर्चेचा विषय ठरला होता. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे दुष्काळग्रस्त असताना आयपीएलचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक भुमिका घेत महाराष्ट्रातील आयपीएलचे सामने इतरत्र हलवण्याचे आदेश दिले होते.

आयपीएलचे सामने महाराष्ट्रात खेळवण्यासाठी क्रिकेट संघटना उत्सुक होत्या. त्यासाठी त्यांनी आयपीएल सामन्यावेळी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात येत आहे असा युक्तीवाद केला होता. मात्र उच्च न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य न धरता आयपीएल सामने हलवण्याचा आदेश दिला होता. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने पाण्याच्या कमतरतेमुळे रूग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागत आहेत असं सांगितलं होतं.

ipl drought
Mohammed Shami : मोहम्मद शमी टी 20 वर्ल्डकप खेळणार की नाही... जय शहांनी दिली मोठी अपडेट

आयपीएल 2016 ची फायनल 29 मे रोजी मुंबईत खेळवण्यात येणार होती. मुंबई आणि पुण्याच्या फ्रेंचायजींनी दुष्काळग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मोठी रक्कम डोनेट करण्याचे आश्वासन देखील दिले होते. असे असतानाही न्यायालयाने सामने इतरत्र हलवण्याचे आदेश दिले. जवळपास 100 वर्षात इतका भीषण दुष्काळ महाराष्ट्रात आला नव्हता.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.