MI Vs KKR : अर्जुनच नाही तर 'जुळे' जॅनसेन बंधूंनीही रचला इतिहास

Marco Jansen Duan Jansen are first twins to play in IPL Sachin Tendulkar Arjun Tendulkar first father-son pair
Marco Jansen Duan Jansen are first twins to play in IPL Sachin Tendulkar Arjun Tendulkar first father-son pair
Updated on

IPL 2023 मध्ये आजचा (रविवार) चा दिवस खास ठरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन सोबतच मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात 22 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज डुआन जॅनसेनने मुंबईसाठी पदार्पण केलं मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केल्यानंतर, डुआनने त्याचा जुळा भाऊ मार्को जॅनसेनसह आणखी खास रेकॉर्डला गवसणी घतली आहे.

मार्का जॅनसेन आणि डुआन जॅनसेन हे आयपीएलमध्ये खेळणारे पहिले जुळे ठरले आहेत. तसेच सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर ही आयपीएलमध्ये खेळणारी पहिली पिता-पुत्र जोडी बनली आहे. योगायोगाने दोन्ही एकाच वेळी घडले आहे - अर्जुन आणि डुआन दोघेही आज मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केलं आहे.

मार्का जॅनसेन आणि डुआन जॅनसेन हे आयपीएलमध्ये खेळणारे पहिले जुळे आहेत. सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर ही आयपीएलमध्ये खेळणारी पहिली पिता-पुत्र जोडी आहे. योगायोगाने दोन्ही एकाच वेळी घडतात - अर्जुन आणि डुआन दोघेही आज MI साठी पदार्पण करत आहेत.

Marco Jansen Duan Jansen are first twins to play in IPL Sachin Tendulkar Arjun Tendulkar first father-son pair
Zigana Pistol : १८ सेकंद २० गोळ्या… मेड इन टर्कीश पिस्तूलाने झाली अतिक-अश्रफची हत्या

मार्का आणि डुआन ही जोडी आयपीएलमध्ये खेळणारी जुळ्या भावांची पहिली जोडी ठरली आहे. मार्को या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. पण, मार्कानेही 2 वर्षांपूर्वी 2021 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्याचा भाऊ दुआनेप्रमाणे पदार्पण केले होते.

मार्का जॅनसेन आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. त्याला मुंबईने 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. पण, आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात, सनरायझर्स हैदराबादने मार्कोला 4.2 कोटींमध्ये विकत घेतले आणि त्याला आयपीएल 2023 साठीही कायम ठेवले. त्याच वेळी, डुआनलाही मुंबईने केवळ 20 लाख रुपयांना खरेदी केले आणि आता त्याने पदार्पण केले आहे.

Marco Jansen Duan Jansen are first twins to play in IPL Sachin Tendulkar Arjun Tendulkar first father-son pair
कोरोनामुळे मृत्यू झाला सांगून रुग्णालयाने अंत्यसंस्कारही उरकले; २ वर्षानी जीवंत परतला, सांगितली आपबिती…

6 फूट 8 इंच उंच असलेले डुआन जॅनसेन ताशी 140 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्याला 2022 मध्ये सीपीएलचा करारही मिळाला होता. मात्र, मार्कोप्रमाणे त्याला अद्याप दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण करु शकलेला नाहीये. मार्को जॅनसेनने दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. मार्कोने कसोटीत 44, वनडेत 10 आणि टी-20 मध्ये 4 बळी घेतले आहेत. त्याने कसोटीत अर्धशतकही झळकावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.