IPL 2023 : आयपीएलमध्ये कॅरिबियन तडका! तो कॅच सोडला अन् पठ्याने फक्त नऊ चेंडू ठोकल्या 50 धावा

Mark Wood Kyle Mayers 7 sixes and 2 fours give LSG a sweeping victory over DC in Tata IPL 2023
Mark Wood Kyle Mayers 7 sixes and 2 fours give LSG a sweeping victory over DC in Tata IPL 2023
Updated on

केली मेयर्स याचा फलंदाजीत झंझावात आणि पाच विकेट मिळवणाऱ्या मार्क वूडची भन्नाट वेगवान गोलदाजी यामुळे लखनौ संघाने दिल्ली कॅपिटलची दाणादण उडवत यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार सुरुवात केली. लखनौने हा सामना 50 धावांनी जिंकला.

लखनौ संघाने उभारलेल्या 193 धावांच्या आव्हानासमोर दिल्लीने चार षटकांत 40 अशी आश्वासक सुरवात केली होती, परंतु मार्क वूडच्या दोन चेंडूंनी चित्रच बदलले त्याने अतिशय वेगात चेंडू टाकून सलग दोन चेंडूंवर पृथ्वी शॉ आणि मिशेल मार्श यांच्या उजव्या यष्टी वाकवल्या. मार्क वूडने त्यानंतर सर्फराझ खानला उसळत्या चेंडूवर बाद केले.

Mark Wood Kyle Mayers 7 sixes and 2 fours give LSG a sweeping victory over DC in Tata IPL 2023
IPL 2023 मधून जवळपास 1 डझन खेळाडू बाहेर! 2 दिग्गज कर्णधारांचाही समावेश...

बिनबाद 41वरून 3 बाद 48 अशी अवस्था झालेल्या दिल्लीचा पराभव सातव्या षटकातच निश्चित झाला होता. दक्षिण आफ्रिकन रेली रॉसोने 30 धावांचे योगदान दिले मात्र रोवमन पॉवेलने पूर्ण निराशा केली त्यामुळे दिल्लीने निम्मा संघ 94 धावांत गमावला तेव्हा त्यांना विजयासाठी आणखी 100 धावांची गरज होती. संघाच्या या पडझडीत कर्णधार डेव्हिड वॉर्नर एक बाजू लढवत होता त्याने अर्धशतक करत पराभवातील अंतर कमी केले.

Mark Wood Kyle Mayers 7 sixes and 2 fours give LSG a sweeping victory over DC in Tata IPL 2023
IPL 2023 : फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी नाही ; धोनी

पहिली आयपीएल खेळत असणाऱ्या वेस्ट इंडीजच्या केली मेयर्सने आपल्या पहिल्याच सामन्यात कमालीची तडाखेबंद फलंदाजी केली. पाचव्या षटकात खलील अहमदने त्याचा झेल सोडला. कर्णधार केएल राहुल अपयशी ठरल्यानंतरही मेयर्सचा झंझावात कायम होता. 38 चेंडूत त्याने दोन चौकार मारताना सात षटकार मारले त्यामुळे लखनौची गाडी सुरुवातीपासून दहा धावांच्या सरासरीने टॉप गिअरमध्ये धावत होती. फक्त चौकात षटकार मिळून नऊ चेंडू तब्बल त्याने 50 धावा ठोकल्या. मेयर्स बाद झाला तेव्हा लखनौच्या 100 धावा झाल्या होत्या.

मेयर्सचा वेस्ट इंडीज संघातील सहकारी निकोलस पूरननेही वेगवान 36 धावांचे योगदान दिले, परंतु अंतिम षटकांत आयुष बदोनीने मारलेले दोन षटकार गौतमच्या वाट्याला आलेल्या एकमेव चेंडूवर त्यानेही मारलेला षटकार त्यामुळे लखनौला 193 धावांची भक्कम धावसंख्या उभारता आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.