Matheesha Pathirana on MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात (IPL 2024) स्पर्धेत संमिश्र कामगिरी केली आहे. असे असले तर संघासाठी श्रीलंकेच्या 21 वर्षीय वेगवान गोलंदाज मिथिशा पाथिरानाने मोलाची भूमिका बजावली आहे.
त्याने या हंगामात 6 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून बेबी मलिंगा म्हणून ओळखला जाणारा पाथिराना चेन्नई संघासाठी महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे.
त्याचे चेन्नईचा लोकप्रिय क्रिकेटपटू एमएस धोनीबरोबरही चांगले बॉन्डिंग राहिले आहे. याबद्दल स्वत: पाथिरानानेच आता प्रतिक्रिया दिली आहे.
पाथिरानाने त्याच्या यशासाठी धोनीने त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासाला श्रेय दिले आहे. त्याने म्हटले आहे की क्रिकेटमध्ये धोनी त्याला त्याच्यासाठी त्याच्या वडिलांसारखा आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या युट्युब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये पाथिराना म्हणाला,'माझ्या वडिलांनंतर माझ्या क्रिकेटमधील आयुष्यात धोनी माझ्या वडिलांची भूमिका साकारतो. कारण तो नेहमी माझी काळजी घेतो, मी काय करायला हवे, असे मला सल्ले देतो. मी घरी असताना माझे वडील जे करतात, तसेच तोही करतो.'
पाथिराना पुढे म्हणाला, 'मी मैदानात असताना किंवा बाहेरही तो मला फार काही सांगत नाही. तो फक्त छोट्या गोष्टी सांगतो, पण त्यामुळे खूप फरक पडतो. त्यामुळे त्या छोट्या गोष्टींमधून मला खूप आत्मविश्वास मिळतो.'
'मैदानाबाहेर आम्ही खूप बोलत नाही, पण जर मला काही त्याला विचारायचे असेल, तेव्हा मी नक्कीच त्याच्याकडे जातो. तो मला प्रत्येकवेळी हेच सांगतो की तुझ्या खेळाचा आनंद घे आणि तुझ्या शरिराची काळजी घे.'
दरम्यान, पाथिराना 2022 पासून चेन्नई संघाकडून खेळत आहे. त्याने आत्तापर्यंत 20 सामन्यांत 34 विकेट्स घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.