Mumbai Indians vs Chennai Super Kings : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे. या 'एल क्लासिको' सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. तुफान वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना सामन्यातून बाहेर गेला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी हे संकेत दिले आहे.
या सामन्याला आयपीएलचा 'एल क्लासिको' देखील म्हटले जाते, कारण दोन्ही लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. एल क्लासिको हा स्पॅनिश शब्द आहे ज्याचा अर्थ उत्कृष्ट आहे. स्पॅनिश फुटबॉलमध्ये, बार्सिलोना-रिअल माद्रिद सामन्याला एल क्लासिको म्हणतात, कारण दोन्ही ला लीगामधील सर्वात यशस्वी क्लब आहेत. त्याच वेळी, चेन्नई आणि मुंबई हे दोन आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत.
सामन्याआधी स्टीफन सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध न खेळलेल्या पाथिरानाबद्दल म्हणाला की, 'पथिरानाची दुखापत आम्हाला वाटली तितकी कमी नाही. त्यामुळे तो लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. अशा सामन्यांमध्ये त्याचे महत्त्व आम्हाला माहीत आहे, पण तो 100 टक्के फॉर्ममध्ये राहील याची आम्ही खात्री करू.
सीएसके तीन विजय आणि दोन पराभवांसह सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवरचा पराभव केला होता. दुसरीकडे मुंबईने सलग तीन पराभवानंतर दोन सामने जिंकून संघ सातव्या स्थानावर आहे. त्यांनी गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. दोन्ही संघ 36 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये सीएसकेने 16 सामने जिंकले आणि मुंबईने 20 सामने जिंकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.