Mayank Yadav Ruled Out Of IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या वेगानं खळबळ माजवणारा संघाचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव संपूर्ण मोसमातून बाहेर पडला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी ही माहिती दिली आहे. लँगर म्हणाला की, आता मयंक यादवसाठी उर्वरित सामन्यांमध्ये खेळणे खूप कठीण आहे.
मयंक यादवबद्दल बोलायचे झाले तर तो मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान जखमी झाला होता. त्या सामन्यादरम्यान मयंक यादव लखनौसाठी 19 वे षटक टाखण्यासाठी आला. या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने मुंबईचा फलंदाज मोहम्मद नबीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, विकेट घेतल्यानंतर मयंक ड्रेसिंग रूममध्ये परतला.
त्यानंतर मयंक यादव माकड हाडाला सूज आल्यामुळे लखनौ सुपर जायंट्सकडून तो शेवटचे पाच सामने खेळू शकला नाही. तंदुरुस्त झाल्यानंतर तो मुंबई इंडियन्सविरुद्ध परतला पण पुन्हा एकदा तो जखमी झाला.
केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी लखनऊचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी मयंक यादवच्या आयपीएलमधून बाहेर पडण्याची पुष्टी केली. मयंकच्या फिटनेसबाबत लँगर म्हणाला की, मला वाटत नाही की तो या स्पर्धेत खेळू शकेल. पण आम्ही प्रार्थना करू. आणि आम्हाला आशा आहे की ते प्लेऑफमध्ये खेळू शकतील.
मयंकचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी त्याला आधी दुखापत झाली होती त्याच ठिकाणी त्याला दुखापत झाली. हे दुर्दैवी आहे. मयंक जसप्रीत बुमराहशी देखील बोलला ज्याने त्याला समजावून सांगितले की दुखापती हा वेगवान गोलंदाजाच्या कारकिर्दीचा एक भाग आहे.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान मयंकला दुखापत झाली आणि फक्त एक षटक टाकल्यानंतर त्याने मैदान सोडले. यानंतर गेल्या मंगळवारी मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून त्याने पुनरागमन केले, मात्र पुन्हा त्याला दुखापत झाल्याने त्याला बाहेर जावे लागले.
आयपीएल 2024 मध्ये ताशी 155 किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयंकला दोन सामन्यांमध्ये चार षटकांचा कोटाही पूर्ण करता आला नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मयंकला ग्रेड-1 ची दुखापत झाली आहे जी बरी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. लखनौ सुपरजायंट्स प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात यशस्वी ठरल्यास, मयंक बाद फेरीचे सामने खेळण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.