तिलक वर्मा लवकरच MI चा कॅप्टन होणार, दिग्गज खेळाडूचा खुलासा

रोहित शर्माने युवा खेळाडू तिलक वर्मा संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे.
 MI captain Rohit feels batter Tilak Varma will be all-format for India very soon
MI captain Rohit feels batter Tilak Varma will be all-format for India very soonesakal
Updated on

मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) संघ प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 11 मॅच खेळणाऱ्या मुंबई संघाला यंदा केवळ 2 मॅचवर कब्जा मिळवता आला आहे. काल झालेल्या सामन्यात मुंबईने चैन्नईचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर रोहित शर्माने तिलक वर्मा (Tilak Varma) संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. तर टीम इंडियाच्या माजी दिग्गज क्रिकेटरने19 वर्षीय युवा खेळाडू तिलक लवकरच मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होणार असल्याचे म्हटले आहे.

सीएसकेवर विजय मिळवल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने तिलक वर्मा लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसेल. कठीण परिस्थितीत त्याने चांगली कामगिरी केली. इतक शांतपणे खेळण अवघड आहे. तो सर्व फॉरमॅटचा खेळाडू आहे. त्याच्याकडे चांगले प्रदर्शन करण्याची ताकद आहे. माझ्या मते तो योग्य मार्गावर आहे. आमच्या सर्वांचे लक्ष त्याच्या खेळावर आहे. असे मत रोहितने यावेळी व्यक्त केले.

 MI captain Rohit feels batter Tilak Varma will be all-format for India very soon
आमच्यासाठी काही निर्णय दुर्दैवी ठरले, CSK च्या हेड कोचने व्यक्त केली खंत

तसेच, स्टार स्पोर्ट्सवर कमेंट्री करत असणारे माजी टीम इंडियाचे खेळाडू आकाश चोपडा हे तिलक वर्माची तुफानी खेळी पाहून चकित झाले आहेत. त्यांनी चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्यादरम्यान, रोहितनंतर मुंबईच्या संघाची कर्णधार पदाची धुरा कोण सांभाळणार याची भविष्यवाणी केली आहे.

 MI captain Rohit feels batter Tilak Varma will be all-format for India very soon
मायकल वॉनचा Virat Kohli ला सल्ला; 'लग्नापूर्वीचा विराट हो'

तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्सचा आगामी कर्णधार असल्याचे आकाश चोपडा यांनी म्हटले आहे. त्याने आत्तापर्यंत 12 मॅचमध्ये 41 च्या सरासरीने 368 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे संघातील असा एकही खेळाडून नाही ज्याने 350 पर्यंत धावा केल्या आहे. तिलकने 2 अर्धशतक झळकावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.