IPL 2023 : धोनीनं तंबी देताच सगळी कशी सुतासारखी सरळ; पाय रेषेच्या पडला आतच

धोनीच्या दुसऱ्या वार्निंग नंतर गोलंदाजांमध्ये सुधारणा…
IPL 2023 : धोनीनं तंबी देताच सगळी कशी सुतासारखी सरळ; पाय रेषेच्या पडला आतच
Updated on

IPL 2023 MS Dhoni : आयपीएल 2023 मध्ये 8 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 12 वा सामना खेळला गेला. वानखेडेवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने मुंबईवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

रोहित शर्माच्या संघाने प्रथम खेळताना 8 गडी गमावून 157 धावा केल्या. विजयासाठी दिलेले 158 धावांचे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्ज संघाने 3 गडी गमावून पूर्ण केले. चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांनी 13 वाईड आणि तीन नो-बॉल टाकले होते. त्यामुळे कुठेतरी महेंद्रसिंग धोनी नाराज झाला होता. पण दुसरा सामना जिंकल्यानंतर धोनी आनंदी दिसला.

IPL 2023 : धोनीनं तंबी देताच सगळी कशी सुतासारखी सरळ; पाय रेषेच्या पडला आतच
IPL 2023: बुडत्याला काडीचा आधार... MS धोनीने वाचवली 'कर्णधारा'ची कारकीर्द!

या सामन्याआधी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना महेंद्रसिंग धोनीने आपल्या गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली होती. खरं तर त्या सामन्यात सीएसकेने वाइड आणि नो बॉलसह अनेक अतिरिक्त धावा दिल्या होत्या. माहीला हे अजिबात आवडले नाही. अशा परिस्थितीत तो सामना संपल्यानंतर म्हणाला होता की, 'नो बॉल किंवा एक्स्ट्रा वाइड बॉल टाकणे टाळावे लागेल. अन्यथा नव्या कर्णधाराखाली खेळावे लागेल. ही माझी दुसरी वार्निंग असेल नाहीतर मग मी निघून जाईन.

त्यामुळे गोलंदाजांवर कुठेतरी दडपण आले होते, पण गेल्या सामन्याच्या धोनीच्या इशाऱ्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजाने एकही नो बॉल टाकला नाही आणि फक्त पाच वाईड्स बॉल टाकले.

IPL 2023 : धोनीनं तंबी देताच सगळी कशी सुतासारखी सरळ; पाय रेषेच्या पडला आतच
IPL 2023: दुसऱ्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित आला रडकुंडीला, 'या' खेळाडूंवर संतापून कर्णधार म्हणाला...

मुंबई इंडियन्सवरील या दणदणीत विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सामन्यापूर्वी संघ सहाव्या क्रमांकावर होता. आयपीएल 2023 मधील सलामीचा सामना गमावल्यानंतर CSK संघ जोरदार पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईचा गुजरात टायटन्सविरुद्ध 5 गडी राखून पराभव झाला होता. मात्र यानंतर लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचा पराभव करण्यात चेन्नईचा संघ यशस्वी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.