IPL 2024 MI vs DC : हुश्श... मुंबई जिंकली एकदाची! शॉ-स्टब्सनं घाम फोडला, मात्र बुमराह मॅजिकनं विजयावर शिक्कामोर्तब

Mumbai Indians vs Delhi Capitals : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत आयपीएलच्या 17व्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.
Mumbai Indians | IPL 2024
Mumbai Indians | IPL 2024Sakal
Updated on

Mumbai Indians vs Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 चा 20 वा सामना रविवारी (7 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात मुंबईने 29 धावांनी विजय मिळवला.

हा मुंबईचा या हंगामातील पहिलाच विजय आहे. यापूर्वी झालेल्या तिन्ही सामन्यात मुंबईने पराभव स्विकारला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 बाद 234 धावा केल्या आणि दिल्लीसमोर 235 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 षटकात 8 बाद 205 धावा करता आल्या.

या सामन्यात दिल्लीकडून पृथ्वी शॉने 66 धावांची आणि ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ७१ धावांची खेळी केली. तसेच अभिषेक पोरेलने 41 धावा केल्या. मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

मुंबईकडून गेराल्ड कोएत्झीने 4 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराहनेही किफायतशीर गोलंदाजी करताना 4 षटकात अवघ्या 22 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने पृथ्वी शॉ आणि अभिषेक पोरेल यांच्या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 49 धावांची खेळी केली, तर टीम डेविडने नाबाद 45 धावा, इशान किशनने 42 धावा आणि हार्दिक पंड्याने 39 धावा केल्या. तसेच रोमरियो शेफर्डने 10 चेंडूत 39 धावांची नाबाद खेळी केली.

दिल्लीकडून अक्षर पटेल आणि एन्रिच नॉर्किया यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच खलील अहमदने 1 विकेट घेतली.

IPL 2024 MI vs DC Live Score : हुश्श... मुंबई जिंकली एकदाची! शॉ-स्टब्सनं घाम फोडला, मात्र बुमराह मॅजिकनं विजयावर शिक्कामोर्तब

या सामन्यात ट्रिस्टन स्टब्सने आक्रमक खेळत अर्धशतक केले होते. त्याने अखेरीसही आक्रमक खेळत दिल्लीचे आव्हान राखले होते. परंतु, त्याला नंतर कोणाची साथ मिळाली नाही.

दिल्लीला अखेरच्या षटकात 34 धावांची गरज होती. हे षटकात गेराल्ड कोएत्झीने टाकले होते. मात्र दिल्लीला 4 धावाच करता आल्या.

याच षटकात ललित यादव, कुमार कुशाग्र आणि झाय रिचर्डसन हे तीन फलंदाज बाद झाले. त्यामुळे दिल्लीला हा सामना 29 धावांनी पराभूत व्हावे लागले. स्टब्स धावांवर 71 नाबाद राहिला. त्याने 25 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह ही खेळी केली.

IPL 2024 MI vs DC Live Score : पांड्याने पकडला ऋषभ पंतचा अफलातून कॅच; अखेरच्या 4 षटकात दिल्लीला 82 धावांची गरज

पाचव्या क्रमांकावर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत फलंदाजीला आला होता. मात्र त्याला फार काळ गेराल्ड कोएत्झीने टिकू दिले नाही. त्याला 16 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कोएत्झीने हार्दिक पांड्याच्या हातून झेलबाद केले.

पांड्याने पळत येत त्याला एक्स्ट्रा कव्हरला झेल घेतला. पंतने 3 चेंडूत 1 धाव केली. 16 षटकात दिल्लीने 4 बाद 153 धावा केल्या. त्यामुळे अखेरच्या चार षटकात दिल्लीला 82 धावांची गरज आहे.

IPL 2024 MI vs DC Live Score : बुमराहने दिल्लीला दिला तिसरा धक्का

ट्रिस्टन स्टब्ससह दिल्लीचा डाव सावरत असलेला अभिषेक पोरेलला 15 व्या षटकात जसप्रीत बुमराहने बाद केले. टीम डेविडने त्याचा झेल घेतला. पोरेलने 31 चेंडूत 41 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने 15 षटकात 3 बाद 144 धावा केल्या.

IPL 2024 MI vs DC Live Score : बुमराहने दाखवली आपली जादू, अर्धशतक करणाऱ्या पृथ्वी शॉला केलं क्लिन-बोल्ड

पृथ्वी शॉ याने अर्धशतक केल्यानंतरही त्याने काही आक्रमक शॉट्स खेळले होते. परंतु, 12 व्या षटकात हार्दिक पंड्याने बुमराहच्या हाती चेंडू सोपवला. बुमराहनेही कमालीची गोलंदाजी करताना पाचव्या चेंडूवर पृथ्वी शॉविरुद्ध अफलातून यॉर्कर टाकला आणि त्याला त्रिफळाचीत केले. शॉ याने 8 चौकार आणि 3 षटकारांसह 40 चेंडूत 66 धावांची खेळी केली.

IPL 2024 MI vs DC Live Score : चौकारासह पृथ्वी शॉचं अर्धशतक, पोरेलच्या साथीत दिल्लीचा सावरला डाव

दिल्लीकडून पृथ्वी शॉ याने 9 व्या षटकात गेराल्ड कोएत्झीविरुद्ध तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. त्याने याच षटकात चौथ्या आणि सहाव्या चेंडूवरही चौकार मारला. त्यामुळे दिल्लीने 9 षटकात 1 बाद 84 धावा केल्या आहेत. दिल्लीकडून शॉ 56 धावांवर नाबाद आहे. त्याच्यासह अभिषेक पोरेल 17 धावांवर नाबाद आहे.

IPL 2024 MI vs DC Live Score : तुफानी फलंदाजीनंतर शेफर्डची गोलंदाजीतही कमाल, दिला दिल्लीला पहिला धक्का

दिल्लीकडून संयमी सुरुवात केलेल्या शॉ आणि वॉर्नर यांची जोडी डाव पुढे नेत होती. मात्र, चौथ्या षटकात रोमरियो शेफर्डने दिल्लीला पहिला धक्का दिला. त्याने डेव्हिड वॉर्नरला चकवले. त्यामुळे वॉर्नर शॉट खेळताना चुकला आणि त्याचा झेल हार्दिक पंड्याने घेतला. वॉर्नर 8 चेंडूत 10 धावा करून बाद झाला.

IPL 2024 MI vs DC Live Score : वॉर्नर-शॉकडून दिल्लीच्या डावाची सुरुवात; मुंबईचे 235 धावांचे लक्ष्य पार करण्याचे आव्हान

मुंबईने दिलेल्या 235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर हे सलामीला फलंदाजीला उतरले आहेत. या दोघांनी तीन षटकात बिनबाद 15 धावा केल्या.

IPL 2024 MI vs DC Live Score : रोहित-इशानच्या आक्रमणानंतर, शेफर्डचं तुफान; मुंबईचे दिल्लीला 235 धावांचे लक्ष्य

या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 235 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 235 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात अखेरच्या षटकात रोमरियो शेफर्डने तुफानी खेळी केली. त्याने 20 व्या षटकात 4 षटकार आणि 2 चौकारांसह 32 धावा चोपल्या. त्यामुळे मुंबईला 230 धावांचा टप्पा पार करणे सहज सोपे झाले. मुंबईने 20 षटकात 5 बाद 234 धावा केल्या.

शेफर्ड 10 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 39 धावांवर नाबाद राहिला. डेविड 21 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 45 धावांवर नाबाद राहिला.

IPL 2024 MI vs DC Live Score : मुंबईचा अर्धा संघ तंबुत, हार्दिकही चांगल्या सुरुवातीनंतर आऊट

हार्दिक पंड्या आणि टीम डेविड यांनी मुंबईचा डाव सावरला होता. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 60 धावांची भागादारीही केली. परंतु, त्यानंतर हार्दिकला एन्रिच नॉर्कियाने 18 व्या षटकात बाद केले. हार्दिकचा झेल फ्रेझर-मॅगर्कने पकडला. हार्दिकने 33 चेंडूत 39 धावांची खेळी केली. मुंबईने 18 षटकात 5 बाद 184 धावा केल्या.

IPL 2024 MI vs DC Live Score : हार्दिक-डेविडने सावरला मुंबईचा डाव, 150 धावांचा टप्पा पार

मुंबईने पाचव्या क्रमांकावर मैदानात उतरलेल्या तिलक वर्माची विकेटही 13 व्या षटकात गमावली. त्याला खलील अहमदने 6 धावांवर बाद केले. पण त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि टीम डेविडने डाव सावरला. त्यामुळे 16 षटकात मुंबईने 4 बाद 150 धावा केल्या.

IPL 2024 MI vs DC Live Score : दमदार सुरुवातीनंतर मुंबईला मोठे धक्के! रोहित-सूर्यापाठोपाठ इशानही बाद

सलामीवी इशान किशन 42 धावांवर बाद झाला. त्यालाही अक्षर पटेलनेच 11 व्या षटकात स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत माघारी धाडले. इशानने 23 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह ही खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर आता मुंबईकडून कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा फलंदाजी करत आहेत. मुंबईने 11 षटकात 3 बाद 113 धावा केल्या.

IPL 2024 MI vs DC Live Score : सूर्या आला... सूर्या गेला... खाते न उघडता झाला आऊट; रोहितचे अर्धशतक हुकले

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला सूर्यकुमार यादव शुन्यावर बाद झाला. त्याला आठव्या षटकात एन्रिच नॉर्कियाने बाद केले. त्याचा झेल फ्रेझर-मॅगर्कने पकडला. त्यामुळे दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या सूर्यकुमारला 2 चेंडू खेळल्यानंतर शुन्यावरच माघारी परतावे लागले.

IPL 2024 MI vs DC Live Score : दणक्यात सुरुवात करणाऱ्या रोहितचं हुकलं अर्धशतक

रोहितने इशान किशनसह दणक्यात सुरुवात केली होती. पहिल्या 6 षटकातच 75 धावा धावफलकावर या दोघांनी लावले होते. मात्र मुंबईला रोहितच्या रुपात पहिला धक्का बसला. रोहितला सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलने त्रिफळाचीत केले.

त्यामुळे रोहितला 27 चेंडूत 49 धावांवर माघारी परतावे लागले. रोहितने या खेळीत 6 चौकार आणि ३ षटकार मारले. मुंबईने 7 षटकात 1 बाद 80 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आहे.

IPL 2024 MI vs DC Live Score : रोहितने केला विश्वविक्रम

रोहित शर्माने पहिल्या पाच षटकातच 3 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यामुळे त्याने टी20 क्रिकेटमध्ये 1500 बाऊंड्रीजचा टप्पा पार केला आहे. असा कारनामा करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू आहे.

त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे या सामन्यात मुंबईने 6 षटकातच बिनबाद 75 धावांपर्यंत मजल मारली.

IPL 2024 MI vs DC Live Score : पॉवर-प्लेमध्ये रोहित-इशानने पाडला चौकार-षटकारांचा पाऊस

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून सलामीला रोहित शर्मा आणि इशान किशन उतरले. त्यांनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्विकारताना चौकार षटकारांचा पाऊस पाडत पहिल्या तीन षटकातच 30 धावांचा टप्पा मुंबईला पार करून दिला.

IPL 2024 MI vs DC Live Score : सूर्या खेळणार.... जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग-11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.

IPL 2024 MI vs DC Live Score : दिल्लीने जिंकली नाणेफेक

मुंबईविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रसिक दार सलामच्या जागी ललित यादव तर जखमी मिचेल मार्शच्या जागी जे रिचर्डसनने प्लेईंग-11 मध्ये जागा मिळाली आहे.

मुंबईत टीम डेव्हिड, जेराल्ड कोट्स, मोहम्मद नबी आणि रोमारिया शेफर्ड हे चार परदेशी खेळाडू आहेत. सूर्यकुमार यादव परतले आहेत. नमन धीरच्या जागी तो संघात आला आहे.

IPL 2024 MI vs DC Live Score : सूर्या आल्यानंतर मुंबईचे नशीब बदलणार? आज पांड्या करणार पंतशी दोन हात

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये निश्चित बदल दिसेल. या सामन्यात सूर्यकुमार यादवचे पुनरागमन होऊ शकते. तो बऱ्याच दिवसांपासून खेळला नाही. सूर्याचे पुनरागमन ही मुंबईसाठी दिलासादायक बातमी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करण्यात तो माहिर आहे. नुकताच तो नेट सेशनमध्ये सराव करताना दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.