MI vs RCB : उत्सुकता शिगेला वानखेडेवर भिडणार विराट-बुमराह! जाणून घ्या कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग-11

मुंबईचे सलग दुसऱ्या विजयाचे ध्येय! वानखेडे स्टेडियममध्ये आज बंगळूरशी लढत
MI vs RCB IPL 2024
MI vs RCB playing xi ipl 2024 News Marathisakal
Updated on

IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru : मुंबई इंडियन्स- रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन संघांमध्ये आज मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल लढत रंगणार आहे. दोन्ही संघांना यंदाच्या मोसमात आतापर्यंत फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आलेला आहे. मुंबईचा संघ आठव्या, तर बंगळूरचा संघ नवव्या स्थानावर आहे.

मुंबईने मागील लढतीत दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले आणि विजयाची बोहणी केली. याप्रसंगी यजमान मुंबईचा संघ सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल. बंगळूरचा संघ सलग चौथा पराभव टाळण्यासाठी मैदानात उतरेल. विराट कोहली- जसप्रीत बुमरा यांच्यामधील लढाई पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

MI vs RCB IPL 2024
Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या भावाला अटक... फसवणूक अन् पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप

रोहित शर्मा (११८ धावा), किशन इशान (९२ धावा) यांच्याकडून समाधानकारक सलामी होत आहे; पण मोठी खेळी करण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करायला हवा. सूर्यकुमार यादवला पुनरागमनच्या लढतीत सूर गवसला नाही; पण त्याच्याकडून अपेक्षा कायम राहणार आहेत. तिलक वर्मा (१२७ धावा) व हार्दिक पंड्या (१०८ धावा) यांनी मधल्या फळीत चमकदार कामगिरी करणे अपेक्षित आहे. कर्णधारपदावरून सातत्याने ट्रोल होत असलेल्या हार्दिकने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

डेव्हिड, शेफर्डमध्ये कलाटणी देण्याची क्षमता

मुंबईच्या संघातील दोन खेळाडूंमध्ये सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. टीम डेव्हिड व रोमारिओ शेफर्ड ही त्यांची नावे. शेफर्ड याने १० चेंडूंमध्ये नाबाद ३९ धावा फटकावल्यामुळे मुंबईला दिल्लीवर विजय साकारता आला. बंगळूरच्या गोलंदाजांना डेव्हिड व शेफर्ड यांना बांधून ठेवावे लागणार आहे.

MI vs RCB IPL 2024
RR vs GT IPL 2024 : पराभवासोबतच संजूला आणखी एक मोठा धक्का! BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

बुमराह, कोएत्झीवर गोलंदाजी अवलंबून

मुंबईच्या संघाला या मोसमात प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजांच्या अपयशाचाही यामध्ये समावेश आहे. जसप्रीत बुमरा (५ विकेट) व गेराल्ड कोएत्झी (७ विकेट) यांनी आतापर्यंत चमक दाखवलेली आहे. बुमराच्या गोलंदाजीवर ६.१२च्या सरासरीने धावा काढण्यात आलेल्या आहेत. कोएत्झीच्या गोलंदाजीवर मात्र दहाच्या सरासरीने धावांची लूट करण्यात आलेली आहे. हार्दिक पंड्या, आकाश मधवाल, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड यांना गोलंदाजीत ठसा उमटवावाच लागणार आहे.

MI vs RCB IPL 2024
ICC World Cup 2027 : शिक्कामोर्तब! क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला; 'या' आठ ठिकाणी रंगणार वर्ल्ड कपचा थरार

एकटा विराट लढतोय

बंगळूरच्या संघातून एकटा विराट कोहली लढत आहे. त्याने पाच सामन्यांमधून एक शतक व दोन अर्धशतकांसह ३१६ धावांचा पाऊस पाडला आहे. कर्णधार फाफ ड्युप्लेसी (१०९ धावा), दिनेश कार्तिक (९० धावा), कॅमेरुन ग्रीन (६८ धावा), ग्लेन मॅक्सवेल (३२ धावा) यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. गोलंदाजीतही त्यांना सुमार कामगिरीतून जावे लागत आहे. मोहम्मद सिराज, ग्रीन, मयांक डागर, अल्जारी जोसेफ यांनी निराशा केली आहे. यश दयाल व ग्लेन मॅक्सवेल यांच्या गोलंदाजीवर मोठ्या प्रमाणात धावांची लूट झालेली नाही; पण त्यांनी सामन्याला कलाटणी देणारा स्पेल केलेला नाही.

यजमान संघाचे वर्चस्व

यजमान मुंबई- बंगळूर यांच्यामध्ये आतापर्यंत ३२ सामने पार पडले आहेत. मुंबईने १८ लढतींमध्ये विजय मिळवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बंगळूरला १४ लढतींमध्ये विजय संपादन करता आला आहे.

मात्र, मागील पाच लढतींच्या निकालावर नजर टाकता बंगळूरचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून येत आहे. बंगळूरने चार लढतींमध्ये विजय मिळवताना मुंबईला बॅकफूटवर फेकले आहे. मुंबईला फक्त एकाच लढतीत विजय संपादन करता आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.