IPL 2024 चा पाकिस्तानला मोठा फटका! न्यूझीलंडने पाठवली 'B' टीम, 13 स्टार क्रिकेटर्स मालिकेतून बाहेर

NZ vs PAK T20I series : या महिन्यात सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे.
NZ vs PAK T20I series
NZ vs PAK T20I series Newssakal
Updated on

NZ vs PAK T20I series : या महिन्यात सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेत न्यूझीलंडचे बहुतांश स्टार क्रिकेटर्स खेळणार नाहीत. हे सर्वजण आयपीएल 2024 मध्ये व्यस्त आहेत.

आपल्या स्टार क्रिकेटर्सचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन न्यूझीलंडने अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेलला पाकिस्तान दौऱ्यासाठी आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे. ब्रेसवेल न्यूझीलंडचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

NZ vs PAK T20I series
Vijender Singh : ऑलिंपिक पदक विजेत्या बॉक्सरचा कॉंग्रेसला रामराम, विनोद तावडेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिचर, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर आणि केन विल्यमसन हे न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. संघाचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता टीम साऊदीच्या नावाचा विचार करण्यात आला नाही. टॉम लॅथम, विल यंग, ​​कॉलिन मुनरो हे देखील वेगवेगळ्या कारणांमुळे पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाहीत.(Michael Bracewell appointed New Zealand captain with top Kiwi stars missing due to IPL)

NZ vs PAK T20I series
T20 World Cup 2024 : IPL मधून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात होणार एंट्री... वर्ल्ड कपमध्ये सिराजचा पत्ता कट?

31 वर्षीय मायकेल ब्रेसवेल दुखापतीमुळे गेल्या वर्षी मार्चपासून मैदानाबाहेर होता. त्याने आपला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना दोन वर्षांपूर्वी खेळला होता. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत फक्त 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

न्यूझीलंडच्या संघात गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप खेळलेल्या सात खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय फलंदाज टीम रॉबिन्सन आणि वेगवान गोलंदाज विल ओ'रुर्के या दोन नव्या चेहऱ्यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिला सामना 18 एप्रिल रोजी रावळपिंडी येथे होणार आहे.

NZ vs PAK T20I series
IPL 2024: दोन विजयांनंतर लखनऊला तगडा झटका! 6 कोटींचा खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर, Video शेअर करत दिली माहिती

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ - मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), फिन ऍलन, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, डीन फॉक्सक्रॉफ्ट, बेन लिस्टर, कोल मॅककॉन्की, ॲडम मिल्ने, जिमी नीशम, विल ओ'रुर्के, टिम रॉबिन्सन, बेन सियर्स, टिम सेफर्ट, ईश सोधी.

पाकिस्तान-न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक

  • 18 एप्रिल – पहिला T20 सामना, रावळपिंडी

  • 20 एप्रिल- दुसरा T20 सामना, रावळपिंडी

  • 21 एप्रिल- तिसरा T20 सामना, रावळपिंडी

  • 25 एप्रिल - चौथा T20 सामना, लाहोर

  • 27 एप्रिल - पाचवा T20 सामना, लाहोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.