IPL 2024 : टूर्नामेंटमधून खेळाडूंना घरी बोलावल्यानं इंग्लंडचा माजी कर्णधार संतापला, म्हणाला...

आयपीएलचे प्ले ऑफ म्हणजे ‘प्रेशर कुकर’सारखे असते....
IPL 2024 : टूर्नामेंटमधून खेळाडूंना घरी बोलावल्यानं इंग्लंडचा माजी कर्णधार संतापला, म्हणाला...
Updated on

पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड संघाने आयपीएलच्या प्ले ऑफमधून माघार घेण्याची चूक इंग्लंड खेळाडूंनी केली, असे स्पष्ट मत इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी व्यक्त केले आहे. आयपीएलचे प्ले ऑफ म्हणजे ‘प्रेशर कुकर’सारखे असते. अतिशय दडपणाखाली खेळण्याच्या अनुभवाचा फायदा त्यांना येत्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत झाला असता, असेही वॉन म्हणाले.

इंग्लंड संघाचे अव्वल खेळाडू आणि कर्णधार असलेल्या जॉस बटलर, (राजस्थान रॉयल्स) फिल साल्ट (कोलकता), विल जॅक्स (बंगळूर) यांनी प्ले ऑफमध्ये न खेळण्याचा निर्यय घेत मायदेशात पाकविरुद्धची टी-२० मालिका खेळण्यास प्राधान्य दिले. आयपीएल महत्त्वाच्या टप्प्यात असताना इंग्लिश खेळाडू आणि त्यांच्या क्रिकेट मंडळाच्या अशा भूमिकेवर सुनील गावसकर यांच्यासह भारताच्या काही माजी खेळाडूंनी टीका केली.

IPL 2024 : टूर्नामेंटमधून खेळाडूंना घरी बोलावल्यानं इंग्लंडचा माजी कर्णधार संतापला, म्हणाला...
Virat Kohli Orange Cap : 'ऑरेंज कॅप IPL ट्रॉफी जिंकून देत नाही....', CSKच्या माजी खेळाडूने विराट कोहलीला पुन्हा मारला टोमणा

इंग्लंड मंडळाने आपल्या खेळाडूंना माघारी बोलावले, असे सांगितले जात असले तरी आपल्या खेळाडूंनी मायदेशातील मालिकेला प्राधान्य द्यायला हवे, अशी भूमिका कर्णधार बटलरने मांडल्याचे इंग्लंड मंडळाचे अध्यक्ष रॉब की यांनीच म्हटले होते.

माझे नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य असते; परंतु आयपीएलबाबत सांगायचे तर येथे असलेले दडपण अनुभवाच्या मोठ्या शिदोरीसारखा असतो. प्रेक्षक, मालक, सोशल मीडिया यांचे मोठे दडपण असते, अशा परिस्थितीत खेळल्यास तुमची मानसिकता अधिक मजबूत होत असते, असे मत वॉन यांनी मांडले. वॉन हे आयपीएलचे समालोचकही आहेत.

जॉस बटलर बऱ्यापैकी आयपीएल स्पर्धांत सहभागी झालेला आहे. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे; परंतु फिल साल्ट आणि विल जॅकसाठी हा अनुभव नवा होता. येथील अनुभवाचा त्यांना येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत निश्चितच फायदा झाला असता, असे वॉन यांनी सांगितले.

IPL 2024 : टूर्नामेंटमधून खेळाडूंना घरी बोलावल्यानं इंग्लंडचा माजी कर्णधार संतापला, म्हणाला...
KKR vs SRH : 'दुर्दैवाने माझा सहकारी स्टार्क...' लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधाराने केलं मोठं वक्तव्य

मला पाकिस्तान किंवा इंग्लंड यांच्यातील मालिकेचे महत्त्व कमी करायचे नाही; पण आयपीएलचा दर्जा मोठा आहे. कारण येथे सदैव तत्पर राहावे लागते. प्रत्येक सामन्यात तुम्ही जागरुक राहून कामगिरी करावी लाहते. त्यामुळे तुमच्या गुणवत्तेची आणि क्षमतेची चाचणी होत असते. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून कदाचित हा अनुभव मिळणार नाही, असे स्पष्ट मत वॉन यांनी मांडले.

ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू यांनी वॉन यांच्याप्रमाणेच मत व्यक्त केले. इंग्लिश खेळाडूंनी आयपीएलच्या अंतिम संग्रामात आपलाही ठसा उमटवण्याची संधी गमावली, असे ते म्हणाले.

IPL 2024 : टूर्नामेंटमधून खेळाडूंना घरी बोलावल्यानं इंग्लंडचा माजी कर्णधार संतापला, म्हणाला...
KKR vs SRH IPL 2024 Final : पॅट कमिन्सने स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड... 'या' 4 कारणांमुळे काव्या मारन ढसाढसा रडली

पाकविरुद्धची मालिका अगोदरपासून नियोजित असली तरी त्या मालिकेत खेळण्यासाठी इंग्लंडकडे इतरही चांगले खेळाडू आहेत; पण या आयपीएलमध्ये पहिल्यापासून खेळत असलेल्या बटलर-साल्ट-जॅक्स यांनी अंतिम टप्प्यातील रणसंग्रामात खेळण्याची संधी गमावली, असे सांगून गिलख्रिस्ट म्हणतात, आयपीएलमध्ये खेळल्यामुळे इतरही बऱ्याच गोष्टी शिकता येतात. वेगवेगळ्या खेळाडूंसह आणि वेगवेगळ्या खेळाडूंच्या विरोधात खेळल्यामुळे मानसिकता भक्कम होत असते, याचा निश्चितच फायदा विश्वकरंडक स्पर्धेसाठी होणार आहे.

बटलर, विल जॅक आणि फिल साल्ट हे प्ले ऑफ खेळणार होते. त्यामुळे त्यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला असता. पाकिस्तानविरुद्ध मायदेशात खेळण्यापेक्षा येथे आयपीएलमध्ये खेळणे कधीही चांगले होते.

- मायकेल वॉन, इंग्लंडचे माजी कर्णधार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com