Mitchell Starc: स्टार्क मोठ्या सामन्यांचा खेळाडू! फायनल आली की करतो सगळे हिशेब चुकते

IPL 2024, KKR vs SRH: मिचेल स्टार्कने पुन्हा पुन्हा सिद्ध करतोय त्याला मोठ्या सामन्यांचा खेळाडू का म्हणतात?
Mitchell Starc
Mitchell Starc Sakal
Updated on

IPL 2024, KKR vs SRH: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा (IPL 2024) अंतिम सामना रविवारी (26 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) झालेल्या या सामन्यात मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले.

स्टार्कने या सामन्यात पहिल्याच षटकात तुफान फॉर्ममध्ये असणारा हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माला त्रिफळाचीत केले. तसेच त्याने राहुल त्रिपाठीलाही बाद केले. त्याने अंतिम सामन्यात 3 षटकात 14 धावा देत या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

स्टार्कला मोठ्या सामन्यांचा खेळाडू असं नेहमीच म्हटलं जातं. जेवढा सामना मोठा आणि महत्त्वाचा त्यावेळी स्टार्कची कामगिरी बहरताना दिसली आहे. इतकेच नाही, तर त्याची आकडेवारीही हेच सिद्ध करते.

Mitchell Starc
IPL Final, KKR vs SRH: स्टार्कचा स्विंग अन् अभिषेकचा झाला झुलता पूल... हैदराबादचं 'हेड'ही स्वस्तात पडलं; पाहा Video

गेल्या 8 महिन्यातील कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर स्टार्क 2023 वनडे वर्ल्ड कप आणि आयपीएल 2024 स्पर्धा खेळला आहे. त्याने वनडे वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीतील 8 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या, तर बाद फेरीतील म्हणजे उपांत्य सामना आणि अंतिम सामन्यांत मिळून 6 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर आयपीएल 2024 मध्ये त्याने साखळी फेरीतील 12 सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या, तर प्लेऑफमधील 2 सामन्यांतच 5 विकेट्स घेतल्या.

इतकेच नाही, तर स्टार्कने आत्तापर्यंत आयसीसीच्या स्पर्धांमध्ये बाद फेरीत (Knock Out Stage) 10 सामन्यांमध्ये खेळताना 20 विकेट्स घेतल्या आहेत.

Mitchell Starc
T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

स्टार्क आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू

दरम्यान, स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूही आहे. त्याला आयपीएल 2024 लिलावादरम्यान संघात घेण्यासाठी अनेक संघांमध्ये शर्यत होती. पण कोलकाताने त्याच्यासाठी 24.75 कोटी रुपये मोजले आणि त्याला संघात सामील करून घेतले. त्यामुळे त्याचे 9 वर्षांनी त्याचे आयपीएलमध्ये पुनरागमन झाले.

स्टार्कने आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आयपीएलच्या इतिहासात 41 सामन्यांमध्ये 51 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.