IPL: '2018 चा कोटा भरून काढायचाय...', 24 कोटींना खरेदी केलेल्या KKR च्या स्टार्कचं मोठं वक्तव्य

Mitchell Starc IPL 2024: मिचेल स्टार्क आठ वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्याला 24 कोटींहून अधिक किंमत मोजत केकेआरने संघात घेतले असून आता या संघाकडून खेळण्याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
Mitchell Starc | IPL 2024
Mitchell Starc | IPL 2024X/ICC
Updated on

Mitchell Starc in IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत यंदा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही खेळताना दिसणार आहे. तो तब्बल 8 वर्षांनी आयपीएलमध्ये खेळण्यास सज्ज आहे.

स्टार्कला आयपीएल 2024 लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाड़ूही आहे. दरम्यान आता पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे स्टार्कने म्हटले आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 2018 साली झालेल्या आयपीएलसाठीही केकेआरनेच त्याला खरेदी केले होते. परंतु, त्याला दुखापतीमुळे त्या हंगामात खेळता आले नव्हते.

त्यानंतरच्या हंगामांमध्ये त्याने सामील न होण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तो आयपीएल 2024 मधून पुन्हा या स्पर्धेत पुनरागमन करणार आहे. यापूर्वी स्टार्क 2014 आणि 2015 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला असून त्याने 27 सामन्यांत 34 विकेट्स घेतल्या आहेत.

Mitchell Starc | IPL 2024
BCCIने आखला मोठा डाव! IPL पुन्हा होणार भारताबाहेर, 'या' देशात रंगणार दुसऱ्या टप्पाचा थरार?

आता आयपीएल 2024 मध्ये केकेआरकडून खेळण्यासाठी येण्याआधी स्टार्क cricket.com.au बरोबर बोलताना म्हणाला, 'आता 8 वर्षे झाले आहेत. मी 2018 मध्ये ज्या संघात खेळायला हवे होते, त्या केकेआर संघात परत येत आहे. आता मला या संघाकडून खेळून 2018 मधील कमी भरून काढण्याची संधी आहे.'

'मला वाटते माझ्या खूप कमी आठवणी आहेत आणि ज्या आगेत त्याने आरसीबीबरोबर 2014-2015 मधील आहेत. पण आता पुन्हा खेळण्यास उत्सुक आहे. नक्कीच संघात नवे खेळाडू असतील. संघात असे खेळाडू असतील, ज्यांना कदाचीत मी भेटलो नसेल किंवा त्यांच्याबरोबर यापूर्वी काम केले नसेल.'

Mitchell Starc | IPL 2024
IPL 2024 : चेन्नईमध्ये 'या' वर्ष मोठे बदल होणार... काय आहे धोनीचा प्लॅन? CSKचा दिग्गज खेळाडू स्पष्टच बोला

तसेच स्टार्क आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या खेळाडूंच्या विरुद्ध खेळला, त्यांच्याबरोबर आता खेळण्यास उत्सुक असल्याचेही त्याने सांगितले. तो म्हणाला, 'असे काही खेळाडू आहे, ज्यांच्याबरोबर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून खेळलो आहे. हे खूप रोमांचक असणार आहे. हे एक नवीन आव्हानही आहे.'

त्याचबरोबर स्टार्क म्हणाला, 'जगातील सर्वोत्तम टी20 लीग म्हणजे एका मेळ्यासारखेच असते. त्यामुळे या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक.'

केकेआर आयपीएल 2024 मधील पहिला सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 23 मार्च रोजी हैदराबादला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.