Mitchell Starc KKR vs SRH : माझं करियर संपत आलं तरी मी पुन्हा येईन... 24 करोड किंमतीच्या खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत

KKR vs SRH Final 2024 Mitchell Starc : आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा एकतर्फी पराभव करून ट्रॉफी जिंकली.
Mitchell Starc KKR vs SRH Final 2024
Mitchell Starc KKR vs SRH Final 2024sakal
Updated on

KKR vs SRH Final 2024 Mitchell Starc : आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा एकतर्फी पराभव करून ट्रॉफी जिंकली. गौतम गंभीरच्या देखरेखीखाली केकेआरची ही तिसरी ट्रॉफी आहे. कोलकाताने यापूर्वी आयपीएल 2012 आणि आयपीएल 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली होती, आता कोलकाताने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2024 ची ट्रॉफी जिंकली आहे. केकेआरच्या या विजयासह कोलकात्याच्या मिचेल स्टार्कने निवृत्तीचे मोठे संकेत दिले आहेत.

Mitchell Starc KKR vs SRH Final 2024
Virat Kohli Orange Cap : 'ऑरेंज कॅप IPL ट्रॉफी जिंकून देत नाही....', CSKच्या माजी खेळाडूने विराट कोहलीला पुन्हा मारला टोमणा

कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे मोठे योगदान होते. आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये स्टार्कने 3 ओव्हरमध्ये फक्त 14 रन्स देऊन 2 विकेट घेतल्या होत्या.

जरी आयपीएल 2024 सुरू झाल्यानंतर स्टार्कवर प्रश्न उपस्थित केले जात असले तरी, स्पर्धेचा शेवट त्याने चांगला केला आहे. केकेआरच्या विजयानंतर मिचेल स्टार्कने मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे केवळ केकेआरचेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाचे लाखो चाहतेही टेन्शनमध्ये आले आहेत. स्टार्कच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

Mitchell Starc KKR vs SRH Final 2024
KKR vs SRH IPL 2024 Final : पॅट कमिन्सने स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड... 'या' 4 कारणांमुळे काव्या मारन ढसाढसा रडली

आयपीएल 2024 च्या फायनल सामन्यानंतर मिचेल स्टार्क म्हणाला की, मी माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या जवळ आहे. मी लवकरच एका फॉरमॅटमधून निवृत्त होऊ शकतो. यावेळी मी आयपीएल खेळण्याचा खूप आनंद घेतला आहे. कोलकाताने मला पुन्हा कायम ठेवले तर मला खूप आनंद होईल.

स्टार्कने आपल्या वक्तव्याने सर्वांनाच चकित केले आहे. मात्र, तो केकेआरसोबत खेळण्यासाठी खूप उत्सुक असल्याचेही त्याने सांगितले आहे. स्टार्कने या आयपीएल हंगामात एकूण 14 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 26.12 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या आहेत. या काळात 33 धावांत 4 विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.