IPL 2022 : कैफने केकेआरवर कुलदीपच्या खच्चीकरणावरून केले गंभीर आरोप

Mohammad Kaif Criticize Kolkata Knight Riders over Kuldeep Yadav Handling
Mohammad Kaif Criticize Kolkata Knight Riders over Kuldeep Yadav Handling esakal
Updated on

आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) सुरू झाला असून प्रत्येक संघाची साधराणपणे 1 मॅच झाली आहे. आतापर्यंतच्या सामन्यात अनेक नव्या - जुन्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. यात डावखुऱ्या चायनामन बॉलर कुलदीप यादवचाही (Kuldeep Yadav) समावेश आहे. कुलदीपने मुंबई विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात दमदार गोलंदाजी करत 18 धावात 3 विकेट घेतल्या. त्याने रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंह आणि केरॉन पोलार्ड या तगड्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Mohammad Kaif Criticize Kolkata Knight Riders over Kuldeep Yadav Handling
IPL Record : लुईसची जलद फिफ्टी; ऑल टाइम रेकॉर्ड कुणाच्या नावे?

कुलदीप यादव हा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा फॉर्ममध्ये आला असला तरी गेला आयपीएल हंगाम त्याने केकेआरकडून (Kolkata Knight Riders) बेंचवर बसून काढला होता. यावर भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) आपले मत व्यक्त केले. त्याने कोलकाता नाईट रायडर्सवर कुलदीप यादवला बेंचवर बसवण्यास दोषी ठरवले. केकेआरने त्याला घरी बसवण्याची पूर्ण तयारीच केली होती असे तो म्हणाला.

Mohammad Kaif Criticize Kolkata Knight Riders over Kuldeep Yadav Handling
VIDEO : डग आउटमधील गंभीरच्या तेवरनं चाहते क्लिन बोल्ड

या माजी खेळाडूने सांगितले की, 'कुलदीपने स्वतःला एक मॅच विनर खेळाडू म्हणून सिद्ध करून दाखवले आहे. मात्र या खेळाडूला थोडं मॅनेज करावं लागतं. तो खूप भावूक आहे. तो कधी कधी लो फिल करत असतो. याचे कारण त्याची मागच्या फ्रेंचायजीने त्याला संधी न देता बाहेर बसवून ठेवले. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि इऑन मॉर्गनच्या कॅप्टन्सीमध्ये त्याच्याबरोबर जे काही झाले त्यामुळे त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला. त्याचा आत्मविश्वास कमी झाला. फ्रेंचायजी त्याला घरी बसण्यास भाग पाडत होती. त्याला टीमबरोबर राहण्याची संधी देखील दिली जात नव्हती. ज्यावेळी एका खेळाडूला अशी वागणूक मिळते त्यावेळी तो कितीही मोठा खेळाडू असला तरी तो दबावात येतो.'

Mohammad Kaif Criticize Kolkata Knight Riders over Kuldeep Yadav Handling
Video Viral : 'गंभीर' रिलेशन 'खंबीर' धोनी त्यांची नवी स्टोरी

गेल्या हंगामात केकेआरचा भाग असलेला कुलदीप यादवला मेगा लिलावात रिलीज केले होते. त्याला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले. कुलदीप यादवने हंगामातील पहिल्याच सामन्यात दमदार गोलंदाजी करत विजयात मोलाचा वाटा उचलण्यात यशस्वी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.