RCB vs CSK : 40 षटके 444 धावा! हा तर शुद्ध वेडेपणा.... भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी फटकारलं

RCB vs CSK Chinnaswamy Pitch
RCB vs CSK Chinnaswamy Pitch esakal
Updated on

RCB vs CSK Chinnaswamy Pitch : कोरोना काळानंतर पहिल्यांदाच आयपीएलच्या 16 व्या हंगामात सर्व 10 संघ हे आपल्या होम ग्राऊंडवर खेळत आहेत. सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात सामना झाला. या सामन्यात गारांचा नाही मात्र धावांचा जोरदार पाऊस झाला. चेन्नईने 20 षटकात तब्बल 226 धावा ठोकल्या तर आरसीबीने देखील 218 धावा ठोकत चिन्नास्वामीची खेळपट्टी ही कशी गोलंदाजांची कबर ठरते हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.

RCB vs CSK Chinnaswamy Pitch
Virat Kohli Tweet : रोहित शर्मा खिजगणतीतच नाही! विराटनं धोनीचा फोटो शेअर करत केलं ट्वीट

या सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि हरभजन सिंग यांनी चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर सडकून टीका केली. मोहम्मद कैफ खेळपट्टीवर टीका करताना म्हणाला की, 'पाटा खेळपट्टी, छोटं ग्राऊंड, इम्पॅक्ट प्लेअर असा सामना पाहिल्यानंतर कोणाला गोलंदाज व्हावं असं वाटले.?' कैफने खेळपट्टीवर टीका करताना आयोजकांवर खोचक टीका देखील केली.

दुसरीकडे स्वतः फिरकीपटू असलेला हरभजन सिंग म्हणाला की, 'चिन्नास्वामी स्टेडियमवरील खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी कब्रस्तान आहे. 40 षटकात 440 धावा, हा शुद्ध वेडेपणा आहे. धोनीने विराटविरूद्ध महत्वाच्या दोन गुणांची कमाई केली. धोनी विजय मिळवण्याचा कायम मार्ग शोधतोच.'

RCB vs CSK Chinnaswamy Pitch
SRH vs MI Playing 11 : 'या' भारतीय खेळाडूसाठी आज कारकीर्द वाचवण्याची शेवटची संधी, कशी असेल MI ची प्लेईंग 11

माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत म्हटल्यावर या गोष्टीकडे गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. अशा सामन्यांमुळे युवा खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. तुषार देशपांडेने तीन विकेट्स घेतल्या मात्र त्याच्या 4 षटकात 45 धावा झाल्या. तर श्रीलंकेच्या मथीशा पथिरानानेही 4 षटकात 41 धावा दिल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाज पार्नेलची देखील अशीच अवस्था झाली होती. त्याने 4 षटकात 48 धावा दिल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.