Mohammad Nabi PBKS vs MI : खांदा दुसऱ्याचा बंदूक आपली... पांड्याला टार्गेट करणाऱ्या नबीच्या त्या स्टोरीची जोरदार चर्चा

Hardik Pandya
Mohammad Nabi PBKS vs MI Hardik Pandya esakal
Updated on

Mohammad Nabi PBKS vs MI : पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबीने दोन झेल आणि एक रन आऊट करत मुंबईच्या विजयात खारीचा वाटा उचलला. पंजाबविरूद्धच्या सामन्यात नबीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. यावरून एका चाहत्याने पांड्यावर टीका करणारी स्टोरी इन्स्टाग्रावर ठेवली होती.

हीच स्टोरी मोहम्मद नबीने देखील आपल्या इन्टाग्रावर ठेवली. काही काळानं ती डिलीट देखील करण्यात आली. मात्र नबीने चाहत्याचा खांदा वापरून हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर टीका तर केली नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.

Hardik Pandya
Jasprit Bumrah Impact Player : गोलंदाजचं मरण... फलंदाजाला खुली सूट... बीसीसीआयच्या नियमावर बुमराहची कडक प्रतिक्रिया

नबीने यंदाच्या हंगामात सहा षटके गोलंदाजी केली आहे. त्याने 43 धावा दिल्या आहेत मात्र त्याला एकही विकेट घेता आलेली नाही. पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात नबीला हार्दिक पांड्याने गोलंदाजी दिली नव्हती. मुंबईने पंजाबविरूद्धचा सामना शेवटच्या षटकात जिंकला होता.

Hardik Pandya
LSG vs CSK : लखनौने सीएसकेला दिला पराभवचा धक्का; 8 विकेट्सनी जिंकला सामना

मुंबईने पंजाब किंग्जविरूद्धचा सामना 9 धावांनी जिंकला. त्यांनी हंगामातील आपला तिसरा विजय साजरा केला. पंजाबने पहिल्या सत्रात खूप विकेट्स गमवाल्या. त्यांची अवस्था 6 बाद 77 धावा अशी झाली होती. मात्र त्यानंतर शशांक सिंहने 25 चेंडूत 41 धावा केल्या. त्यानंतर आशुतोष शर्माने 25 चेंडूत 61 धावा ठोकल्या. ही त्याची आयपीएलमधील पहिली फिफ्टी होती.

मात्र या दोघांच्या दमदार फलंदाजीनंतरही मुंबईने सामन्यावर पकड निर्माण करण्यात यश मिळवलं अन् शेवटच्या षटकात सामना जिंकला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि कॉट्झी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.