नवी दिल्ली: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये (RCB Podcast) एक मोठा खुलासा केला आहे. त्याला 2019 च्या आयपीएल (IPL) हंगामानंतर क्रिकेट सोडून वडिलांबरोबर रिक्षा चालवण्याचा सल्ला दिल्याचे त्याने सांगितले. सिराजला त्यावेळी त्याची कारकिर्द संपुष्टात आली असे वाटले होते. मात्र एमएस धोनीच्या (MS Dhoni) सल्ल्याने त्याला वाचवले.
मोहम्मद सिराजचा 2019 चा आयपीएल हंगाम फार काही चांगला गेला नव्हता. त्याला 9 सामन्यात 7 विकेटच घेता आल्या होत्या. विशेष म्हणजे त्याची धावा देण्याची सरासरी 10 होती. या हंगामात आरसीबी (RCB) सलग 6 सामने हरली होती. मोहम्मद सिराजने केकेआर विरूद्ध तर दोन बिमर देखील टाकले होते.
सिराज सांगतो की, 'मी ज्यावेळी केकेआर (KKR) विरूद्धच्या सामन्यात दोन बिमर टाकले. त्यानंतर लोकं मला क्रिकेट सोड आणि तुझ्या वडिलांबरोबर रिक्षा चालव असे सांगत होते. त्यावेळी लोक खूप कमेंट करत होती. मात्र त्यांना इथपर्यंत पोहचण्यासाठी केलेला संघर्ष माहिती नव्हता. पण मला आठवतयं की ज्यावेळी मी पहिल्यांदा निवडलो गेलो होते. त्यावेळी माही भाईने (MS Dhoni) मला सांगितले की लोक जे तुला सांगत आहेत ते सगळंच ऐकायची गरज नाही.'
सिराजने सांगितले की त्यावेळी धोनी म्हणाला होता की, 'आज तू चांगली कामगिरी केलीस की हेच लोकं तुझे कौतुक करतील मात्र तू चांगली कामगिरी केली नाहीस तर हेच लोकं तुला वाईट बोलतील. त्यामुळे हे जास्त गांभीर्याने घ्यायचं नाही.' सिराज पुढे म्हणाला की, ज्या लोकांनी मला त्यावेळी ट्रोल केलं होतं तेच आता मी चांगला गोलंदाज असल्याचं सांगतात. त्यामुळे मला कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही. आधीचा सिराज होता तसाच आताही तो आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.