LSG vs GT : 2, W, W, W1, W1, 0 मोहित करणारे शेवटचे षटक! संथ राहुलचा बसला लखनौला फटका; जिंकलेला सामना हरला

LSG vs GT Mohit Sharma Shine KL Rahul Slow Strike Rate
LSG vs GT Mohit Sharma Shine KL Rahul Slow Strike Rate esakal
Updated on

LSG vs GT Mohit Sharma Shine KL Rahul Slow Strike Rate : आयपीएलच्या 30 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने ठेवलेल्या 136 धावांचा पाठलाग करताना लखनौने 15 षटकात 2 बाद 106 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र शेवटच्या पाच षटकात लखनौला 5 फलंदाज गमवूनही साध्या 30 धावा निघाल्या नाहीत. कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 68 धावा केल्या. मात्र यासाठी त्याने 61 चेंडू खाल्ले. गुजरातने सामना अखेरच्या षटकापर्यंत खेचला अन् शेवटच्या षटकात 12 धावांची गरज असताना अनुभवी मोहित शर्माने फक्त 4 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. लखनौचे 2 फलंदाज याच षटकात धावबाद देखील झाले. लखनौने जिंकलेला सामना 7 धावांनी गमवला.

LSG vs GT Mohit Sharma Shine KL Rahul Slow Strike Rate
LSG vs GT IPL 2023 : राहुलचे अर्धशतक वाया, गुजरातने गेलेला सामना आणला खेचून

गुजरात टायटन्सने लखनौ समोर विजयासाठी 136 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर फलंदाजीला आलेल्या केएल राहुल आणि कायल मेयर्स यांनी 6 षटकात 53 धावा करत दमदार सुरूवात केली. मात्र ही जोडी राशिद खानने फोडली. त्याने मेयर्सला 24 धावांवर बाद केले. त्यानंतर केएल राहुलने क्रुणाल पांड्याच्या साथीने संघाला 106 धावांपर्यंत पोहचवले.

LSG vs GT Mohit Sharma Shine KL Rahul Slow Strike Rate
KL Rahul IPL Record : राहुल स्लो असला म्हणून काय झालं आज भावानं ढासू रेकॉर्ड केलाय!

यानंतर लखनौच्या फलंदाजीला गळती लागली. केएल राहुलने लखनौसाठी 68 धावांची खेळी केली. मात्र ही खेळी लखनौच्याच मुळावर आली. आधी चांगल्या धावगती धावा करणारा केएल राहुल नंतर संथ पडला. त्यामुळे गुजरातला सामना शेवटच्या षटकापर्यंत नेण्यात यश आले. शेवटच्या षटकात 12 धावांची गरज असताना मोहित शर्माने फक्त 4 धावा देत दोन विकेट्स मिळवल्या. त्याने केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांना शेवटच्या षटकात बाद केले. तसेच लखनौचे दोन फलंदाज धावबाद देखील झाले. गुजरातने सामना 7 धावांनी जिंकला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.