MS Dhoni IPL 2023 : तर मला कोणताही संघ खरेदी करणार नाही... धोनीचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

MS Dhoni 2019 Video
MS Dhoni 2019 Videoesakal
Updated on

MS Dhoni 2019 Video : चेन्नई सुपर किंग्ज विक्रमी 10 व्यांदा आयपीएलची फायनल खेळणार आहे. चेन्नईने क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव करत फायलन गाठली. यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला हर्षा भोगले यांनी अनेक प्रश्न विचारले. यात त्याच्या निवृत्तीच्या प्रश्नाचा देखील समावेश होता. मात्र धोनीने खुबीने या प्रश्नांची उत्तरे देत आपले इरादे गुलदस्त्यातच ठेवले. दरम्यान, यानंतर धोनीचा 2019 चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. यात देखील हर्षा भोगलेच धोनीला एक प्रश्न विचारतात.

MS Dhoni 2019 Video
Virat Kohli IPL 2023 : विराट कोहलीने इतिहास रचला! दणदणीत फॉलोअर्ससह ठरला आशियातील पहिला खेळाडू

आयपीएलने हा व्हिडिओ 24 एप्रिल 2019 ला पोस्ट केला होता. या व्हिडिओत हर्षा भोगले विचारतात की, चेन्नई संघाची खास गोष्ट काय आहे. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवता? ही गोष्ट जवळपास नक्की असते की तुम्ही लोकं प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करणारच.

यावर धोनीने अत्यंत खुबीने उत्तर दिले. धोनी म्हणाला की, जर मी हे सर्वांना सांगितले तर मला लिलावात कोणी खरेदी करणार नाही. त्यामुळे तुम्ही याला माझे ट्रेड सिक्रेट म्हणून शकता.'

चेन्नई सुपर किंग्जने 2019 च्या हंगामात देखील प्ले ऑफ क्वालिफाय केले होते. मात्र या हंगामात धोनीच्या सीएसकेला रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने पराभवाची धूळ चारली होती.

आयपीएल फायलनमधून धोनी आऊट?

चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामन्यात दुसऱ्या डावाच्या 16 व्या षटकात धोनीने ऑन फिल्ड अंपायर्ससोबत दीर्घ चर्चा केली होती. यामुळे वाद निर्माण झाला आहे. धोनीला वाटत होते की श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज पथिरानाने 16 वे षटक टाकावे.

MS Dhoni 2019 Video
Harsha Bhogle IPL 2023 : हर्षा भोगलेंनी चेन्नईच्या प्रेक्षकांचे कौतुक करत कोणावर साधला निशाणा?

मात्र अंपायर्सनी त्याला असे करण्याची परवानगी दिली नाही. पथिराना या षटकाच्या आधी फिल्डिंग करण्यासाठी मैदानावर हजर नव्हता. त्यामुळे पथिरानाला षटक टाकण्याची परवानगी देता येणार नाही असे अंपायर्सचे म्हणणे होते. ही गोष्ट धोनीला आवडली नाही. त्याने अंपायर्स सोबत वाद घातला. हा वाद खूप काळ सुरू होता. त्यामुळे बराचवेळ सामना थांबला होता.

मात्र नंतर धोनीचे काम झाले. पथिरानाने आवश्यक वेळ मैदानावर घालवला अन् पथिरानाला गोलंदाजी करण्याची परवानगी मिळाली. परंतु याचा फटका धोनीला बसू शकतो. धोनीवर संथ गतीने षटके टाकल्याप्रकरणी फाईन लागू शकतो. मात्र याबाबत अजून तरी अधिकृत घोषणा झालेली नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.