IPL 2024: माहीला पाहून खुश झाला 103 वर्षांचा सुपरफॅन! धोनी अन् CSK कडून मिळालं स्पेशल गिफ्ट...पाहा Video

CSK 103 Years old Fan: एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स संघाने 103 वर्षीय चाहत्याला खास भेट दिली आहे.
CSK 103 Years Old Fan
CSK 103 Years Old FanSakal
Updated on

CSK 103 Years old Fan: आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाची मोठी लोकप्रियता आहे. जगभरातील लोकप्रिय क्रीडा संघांमध्ये या संघाचे नाव येते. यामागे या संघाकडून खेळणारा एमएस धोनी हे एक मोठे कारण आहे.

भारताचा आणि चेन्नईचा माजी कर्णधार असलेल्या धोनीचा मोठा चाहतावर्ग जगभरात आहे. त्याचमुळे क्रिकेट चाहत्यांकडून चेन्नई संघालाही प्रेम मिळते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धोनी आणि चेन्नई संघाच्या एका १०३ वर्षीय चाहत्याचा व्हिडिओ समोर आला होता. या चाहत्याचे नाव एस रामदास आहे.

CSK 103 Years Old Fan
SRH vs RR: हैदराबादला मॅच जिंकून देणारा भूवीचा जबरदस्त यॉर्कर अन् काव्या मारनचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहा शेवटच्या चेंडूचा थरार

या आजोबांनी सांगितले होते की ते आयपीएलचे सामने सुरुवातीपासून पाहात आहेत आणि त्यांना ते आवडतात.

पूर्वी ते ब्रिटिश आर्मीमध्ये कामाला होते. ते क्रिकेटही खेळायचे पण चेंडू लागेल अशी भीती वाटत असल्याने ते गोलंदाजी करायचे.

दरम्यान, आता या आजोबांना धोनीने एका खास गिफ्ट पाठवले आहे. याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला आहे.

CSK 103 Years Old Fan
IPL 2024 Points Table: हैदराबादचा राजस्थानवर 1 धावेनं विजय अन् CSK चं वाढलं टेंशन, जाणून घ्या पाँइंट्स टेलबची स्थितीत

या व्हिडिओमध्ये दिसते की एस रामदास यांचे नाव लिहिलेली आणि त्यांच्या १०३ वयाचा क्रमांक लिहिलेल्या चेन्नईच्या जर्सीवर धोनीने त्याची स्वाक्षरी केली आणि त्यावर तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद असा संदेशही लिहिला आहे.

ही जर्सी नंतर एस रामदास यांना भेट म्हणून देण्यात आली. यानंतर एस रामदास यांनी आनंदही व्यक्त केला आहे. दरम्यान, या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.

दरम्यान, चेन्नई संघाच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर त्यांची आयपीएल 2024 च्या हंगामात संमिश्र कामगिरी झाली आहे. चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 5 सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे सध्या चेन्नई 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.