धोनी अभी जिंदा है! पाहा रन आऊटचा भन्नाट VIDEO

MS Dhoni Bhanuka Rajapaksa Run Out
MS Dhoni Bhanuka Rajapaksa Run Outesakal
Updated on

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) या दोन किंग्जमध्ये आज फाईट होत आहे. चेन्नईसाठी आजचा सामना हा महत्वाचा आहे. कारण गेल्या दोन सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने पंजाबचे दोन फलंदाज पहिल्या दोन षटकातच बाद करत चांगली सुरुवात केली. दरम्यान, पंजाबचा फलंदाज भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) धावबाद (Run Out) झालेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजपक्षेला धावबाद करण्यात महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) मोठी भुमिका बजावली आहे.

MS Dhoni Bhanuka Rajapaksa Run Out
VIDEO: आपलीच माणसं घात करतात ते असं; गोलंदाजानं हसावं की रडावं?

महेंद्रसिंह धोनीने आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधीच सीएसकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर धोनी आता आयपीएलमधून निवृत्त होणार अशी चर्चा सुरू झाली. त्याच्या वाढच्या वयाबद्दल देखील अनेक कमेंट येत होत्या. मात्र धोनीने फलंदाजीत धडाक्यात सुरुवात करत पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. त्यानंतर आज पंजाब विरूद्धच्या सामन्यात विकेट मागे आपला जुना जलवा पुन्हा दाखवून दिला.

MS Dhoni Bhanuka Rajapaksa Run Out
चार IPL संघ पाक-ऑस्ट्रेलिया टूर संपण्यावर बसलेत टपून

राजपक्षेच्या रनाऊटचा व्हिडिओ पाहिला तर लक्षात येईल की ज्यावेळी राजपक्षे आणि शिखर धवनमध्ये चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गोंधळ निर्माण झाला. याचा फायदा उचलत गोलंदाजी करणाऱ्या ब्रोव्होने चेंडू विकेटकिपर एंन्डला थ्रो केला. मात्र थ्रो फारसा अचूक नव्हता. तेवढ्यात धोनीने जोरात धाव घेत तो चेंडू पकडला आणि लांबूनच स्टंपवर टाकला. धोनीने दाखवलेल्या चपळाईमुळे राजपक्षे धावबाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.