CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Fans Saying MS Dhoni Selfies : या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाब किंग्जने हा सामना 13 चेंडू शिल्लक असताना 7 गडी राखून जिंकला.
MS Dhoni called out as selfish for screaming at Daryl Mitchell News Marathi
MS Dhoni called out as selfish for screaming at Daryl Mitchell News Marathisakal
Updated on

MS Dhoni-Daryl Mitchell IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 49 व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दणदणीत विजय मिळवला. पंजाबने हा सामना 7 गडी राखून जिंकून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

दरम्यान या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आणि ही घटना पाहून चाहते महेंद्रसिंग धोनीला सेल्फिश म्हणत आहेत.

MS Dhoni called out as selfish for screaming at Daryl Mitchell News Marathi
CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

महेंद्रसिंग धोनी आणि डॅरिल मिशेल चेन्नई सुपर किंग्जसाठी शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करत असताना ही घटना घडली. अर्शदीप सिंग पंजाबसाठी ओव्हर टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माहीने चौकार ठोकला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही.

माहीने तिसरा चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू लाँग ऑफ बाऊंड्रीकडे गेला. त्यानंतर डॅरिल मिशेलने सिंगल घेण्यासाठी दुस-या टोकाला जवळपास पोहोचला, पण माहीने त्याला माघारी पाठवले. म्हणजेच मिचेल धावत आला आणि परत गेला अशा स्थितीत त्याने 2 धावा पूर्ण केल्या, पण धोनी त्याच्या क्रीजवर राहिला. धोनीने पळून जाण्यास नकार दिला नसता तर चेन्नईच्या खात्यात आणखी 2 धावा जमा झाल्या असत्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MS Dhoni called out as selfish for screaming at Daryl Mitchell News Marathi
Champions Trophy 2025: पाकिस्तानची लगीनघाई! स्पर्धेच्या शेड्युलचा ड्राफ्ट तयार, भारतीय संघाचे सामने ठरवले 'या' शहरात

या हंगामात याआधी पण ही घटना धोनी आणि जडेजासोबत पाहायला मिळाली होती. त्यावेळी धोनी आणि जडेजा फलंदाजी करत होते, इथेही धोनीने 2-3 वेळा सिंगल्स घेण्यास नकार दिला. आपण क्षणभर असे गृहीत धरू की जडेजा इतका चांगला फलंदाज नाही, म्हणून धोनीने नकार दिला असावा.

पण डॅरिल मिशेल हा स्फोटक फलंदाज आहे आणि या हंगामात फॉर्मात आहे, पण तरीही माहीने त्याला स्ट्राईक दिली नाही. याच कारणामुळे चाहते माहीला सेल्फिश म्हणत आहेत. या सामन्यात धोनीने 11 चेंडूत 14 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.