IPL 2024 : चेन्नईमध्ये 'या' वर्ष मोठे बदल होणार... काय आहे धोनीचा प्लॅन? CSKचा दिग्गज खेळाडू स्पष्टच बोला

IPL 2024 Chennai Super Kings : भारतीय क्रिकेट संघाचा माजी मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
IPL 2024 Chennai Super Kings Marathi News
IPL 2024 Chennai Super Kings Marathi Newssakal
Updated on

IPL 2024 Chennai Super Kings : भारतीय क्रिकेट संघाचा माजी मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

आयपीएलदरम्यान सामन्याच्यामध्ये धोनी संघाचे कर्णधारपद एखाद्या खेळाडूकडे सोपवू शकतो, असे रायडूचे म्हणणे आहे. सीएसकेकडून खेळलेल्या रायुडूचे मत आहे की, भविष्य डोळ्यासमोर ठेवून माही हे करू शकतो जेणेकरून आगामी काळात चेन्नईसाठी नवीन कर्णधार तयार करता येईल.

IPL 2024 Chennai Super Kings Marathi News
T20 World Cup 2024 : पाऊस अन् वादळानंतरही सामन्याचा निकाल लागणार! सेमीफायनल अन् फायनलसाठी ICC ची मोठी घोषणा

अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने कर्णधारपद सोपवले होते. परंतु सलग पराभवानंतर त्याने कर्णधारपद सोडले आणि धोनी पुन्हा कर्णधार झाला. तेव्हापासून धोनी कर्णधार आहे आणि त्याने CSK ला 2023 मध्ये पाचवे विजेतेपद मिळवून दिले.

IPL 2024 Chennai Super Kings Marathi News
WPL 2024 : 'मी आऊट झाल्यानंतर...' पराभवानंतर हरमनप्रीतने सांगितले कुठे झाली चूक

गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा करणाऱ्या अंबाती रायडूने स्टार स्पोर्ट्स प्रेस रूमला सांगितले की, 'इम्पॅक्ट प्लेअर नियमाद्वारे धोनी मधल्या षटकांमध्ये कर्णधारपद दुसऱ्या कोणाकडे सोपवू शकतो. हे वर्ष CSK साठी बदलाचे वर्ष असू शकते. या पुर्ण हंगामात त्याने कर्णधारपदी राहावे अशी माझी इच्छा आहे.' धोनीने नुकतेच फेसबुक पोस्टमध्ये संकेत दिले होते की, तो यंदाच्या आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत असेल.

अंबाती रायुडू आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्रीमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. रायुडूने भारतासाठी 55 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि 6 टी-20 सामने खेळले. आयपीएलमधील अनेक हंगाम तो सीएसकेकडून खेळला. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी 2018 मध्ये झाली जेव्हा त्याने एकूण 602 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.