MS Dhoni IPL Retirement : लखनौविरूद्धच्या सामन्यापूर्वीच धोनी निवृत्तीबाबत बोलला

MS Dhoni IPL Retirement
MS Dhoni IPL Retirementesakal
Updated on

MS Dhoni IPL Retirement : लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये आज लखनौ सुपर जायंट्स चेन्नई सुपर किंग्जशी भिडत आहे. आजचा सामना जरी लखनौच्या होम ग्राऊंडवर असला तरी संपूर्ण स्टेडियम हे सीएसकेच्या पिवळ्या रंगात रंगले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे महेंद्रसिंह धोनी!

सध्या धोनी भारतातील कोणत्याही स्टेडियमवर गेला तरी त्याच्या पाठीराख्यांच्या संख्येत काही वजाबाकी होत नाही. धोनीने जरी अधिकृतरित्या हा आपला शेवटचा आयपीएल हंगाम असल्याचे घोषित केले नसले तरी त्याने इशारो इशारो में याचे संकेत दिले आहेत. म्हणूनच स्टेडियम कोणतेही असो सीएसकेच्या सामन्यात प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये पिवळ्या रंगाचाच बोलबाला असतो.

MS Dhoni IPL Retirement
LSG vs CSK : पावसामुळे चेन्नई - लखनौ सामना अनिर्णित, दोघांना मिळाले समान गुण

आजच्या सामन्यात देखील स्टेडियम पिवळ्या रंगात रंगून गेले होते. हाच मुद्दा पकडून नाणेफेकीवेळी समालोचक डॅनी मॉरिसन यांनी आडून आडून धोनीला निवृत्तीबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी धोनीने त्यांना अत्यंत समर्पक उत्तर देत आपले इरादे खुबीने गुलदस्त्यातच ठेवले.

मॉरिसनने धोनीला तू तुझा शेवटचा हंगाम कसा एन्जॉय करतोयस असे विचारले. त्यावर धोनीने हसून तुम्ही हा माझा शेवटचा हंगाम असल्याचे आधीच ठरवून टाकले असे मिश्कीलपणे म्हणत थेट उत्तर देणे टाळले. यावर मॉरिसन मैदानातील चाहत्यांना उद्येशून म्हणाले की धोनी पुढच्या वर्षी देखील खेळण्यासाठी येणार आहे. तुला पाहून खूप बरे वाटले.'

MS Dhoni IPL Retirement
Sunil Gavaskar IPL 2023 : एखाद्या कोटीनं काय फरक पडणार.... गावसकर कोहली - गंभीरवरील बीसीसीआयच्या कारवाईवर नाराज

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय चेन्नईच्या फिरकीपटूंनी सार्थ ठरवत लखनौचा निम्मा संघ 50 धावातच गारद केला. पॉवर प्लेमध्ये मोईन अली आणि तिक्षाणा यांनी लखनौला धक्के दिले तर पॉवर प्लेनंतर रविंद्र जडेजाने लखनौच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली. त्यामुळे लखनौची अवस्था 12 षटकात 5 बाद 52 धावा अशी झाली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()