CSK vs MI IPL 2023: 4777 दिवसांनंतर चेपॉकमध्ये धोनीच्या चेन्नईने मुंबई इंडियन्सचा केला पराभव

MS Dhoni Chennai Super Kings
MS Dhoni Chennai Super Kings
Updated on

Chennai Super Kings beat Mumbai Indians : सलग तीन सामन्यांत विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने दमदार पुनरागमन करत 4777 दिवसांनंतर चेपॉकमध्ये चेन्नईने मुंबई इंडियन्सचा पराभव केला.

चेपॉक स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी सामन्यात चेन्नईने आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. सलग दोन सामन्यांत 200 हून अधिक धावसंख्येचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरलेल्या मुंबई संघाला प्रथम फलंदाजी करताना केवळ 139 धावा करता आल्या, जे चेन्नईसाठी फारसे अवघड नव्हते. यासह सीएसकेने सहाव्या विजयाची नोंद केली आहे.

MS Dhoni Chennai Super Kings
Rohit Sharma Duck : लज्जास्पद रेकॉर्ड! आयपीएलच्या कारकिर्दीत रोहित शर्माच्या करिअरला लागला काळा डाग

चेन्नई सुपर किंग्ज नेहमीच चेपॉकच्या त्यांच्या घरच्या मैदानावर असले तरी त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध बराच काळ विजय मिळवता आला नाही. शेवटच्या वेळी 2010 मध्ये चेन्नईने चेपॉकमध्ये मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर सलग 6 वेळा केवळ मुंबईला विजय मिळवला. या विजयासह चेन्नईची 13 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली.

चेन्नईसाठी, ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या फॉर्मात असलेल्या जोडीने पुन्हा एकदा वेगवान सुरुवात करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दोघांनी 4 षटकात केवळ 46 धावा केल्या होत्या. पाचव्या षटकात गायकवाड बाद झाला. दुसरीकडे अजिंक्य रहाणेने येऊन संघाला मजबूत केले.

शिवम दुबे येताच त्याने आपल्या शैलीत मोठे फटके मारले आणि षटकार ठोकले. दुसरीकडे, कॉनवेला यावेळी मोठी खेळी करता आली नाही, मात्र त्याने 44 धावा करत संघाचा विजय निश्चित केला. तो 17व्या षटकात बाद झाला आणि तोपर्यंत संघाने 130 धावा केल्या होत्या. कॉनवेची विकेट पडल्यानंतर कर्णधार एमएस धोनी क्रिजवर आला आणि चेन्नईच्या चाहत्यांसमोर त्याने एक धाव घेत संघाला विजयापर्यंत नेले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 139 धावा करता आल्या. मुंबईकडून नेहल वढेराने सर्वाधिक 64 धावा केल्या. त्याचवेळी सूर्यकुमारने 26 आणि ट्रिस्टन स्टब्सने 20 धावा केल्या.

या तिघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक तीन तर दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाने एक विकेट मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.