MS Dhoni IPL 2024 : धोनी आला की ध्वनी प्रदुषण! यंदाच्या हंगामात 'या' सामन्यात प्रेक्षकांनी केला रेकॉर्ड ब्रेक दंगा

MS Dhoni IPL 2024 : चेन्नईचा संघ कुठंही गेला तरी हवा धोनीचीच असते. मात्र धोनीची एन्ट्री कधी कधी ध्वनी प्रदुषणाला देखील आमंत्रण देते.
MS Dhoni
MS Dhoni Entry During CSK vs RCB Peaked Noise Level Of IPL 2024esakal
Updated on

MS Dhoni Entry During CSK vs RCB Peaked Noise Level Of IPL 2024 : आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त फॅन बेस असलेल्या फ्रेंचायजींमध्ये सीएसकेचा नंबर अव्वल आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे पर्यायाने सीएसकेचा चाहते फक्त चेन्नईतच नाहीत तर संपूर्ण देशभरात आहेत. त्यामुळे चेन्नईचा संघ कुठंही गेला तरी हवा धोनीचीच असते.

धोनीने 2020 मध्ये आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. यामुळे चेन्नईचे चाहते आपल्या लाडक्या थलाला पाहण्यासाठी आयपीएल हंगाम सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत असतात. त्यामुळे धोनीच्या सामन्यावेळी प्रत्येक एन्ट्रीला चाहते स्टेडियम डोक्यावर घेतात. यामुळं थोडं ध्वनी प्रदुषण होतं. मात्र लाडक्या थलासाठी एवढं चालायचंच!

नुकतेच आयपीएलच्या अधिकृत टीव्ही ब्रॉडकास्टर्सनी एक अभ्यास केला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सामन्यांची ध्वनी पातळी तपासण्यात आली. यात भन्नाट असे आकडे समोर आले आहेत.

MS Dhoni
Suryakumar Yadav: 'आम्ही काय बिघडवलं, सूर्या दादा?', CSK च्या सामन्याआधी मिस्टर 360ने हे काय केलं?

स्टार स्पोर्ट्सने प्रेक्षकांचा आवाजाची तपासणारे नवे तंत्रज्ञान यंदाच्या हंगामात वापरले आहे. यावेळी हंगामातील काही सामन्यात आवाजाची टिपेला पोहचली होती. यातील दोन सामने हे सीएसकेचे होते अन् धोनी मैदानावर असताना ही आवाजाची पताळी रेकॉर्ड ब्रेक होती.

मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या हंगामात प्रेक्षकांच्या आवाजाची सर्वोच्च पातळी ही 130 डेसिबल इतकी होती. हा सामना होता आरसीबी विरूद्ध सीएसके! चिदंबरम स्टेडियमवरील या सामन्यात ज्यावेळी धोनीने मैदानात प्रवेश केला त्यावेळी प्रेक्षकांनी मोठा आवाज करत स्टेडियम डोक्यावर घेतलं होतं.

त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात ज्यावेळी धोनीने चौकार मारला त्यावेळी देखील प्रेक्षकांनी जोरदार दंगा केला होता. त्यावेळी आवाजाची पातळी ही 128 डेसिबल इतकी पोहचली होती. धोनी त्यावेळी हंगामात पहिल्यांदाच फलंदाजीला आला होता. धोनीने या सामन्यात 16 चेंडूत 37 धावांची नाबाद खेळी करत दिल्लीचं टेन्शन वाढवलं होतं.

MS Dhoni
IPL 2024: मुंबईच्या रस्त्यांवरही CSK चीच हवा! खेळाडूंची झलक टिपण्यासाठी चाहत्यांची गर्दी, पाहा Video

यंदाच्या हंगामात अजून एका सामन्यात प्रेक्षकांच्या आवाजाची पातळी ही 128 डेसिबल पर्यंत पोहचली होती. रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा विकेटकिपर बॅटर दिनेश कार्तिकने पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात षटकार मारला होता. हा सामना चिन्नस्वामी स्टेडियमवर झाला होता. या क्षणाला प्रेक्षकांच्या आवाजाची पातळी ही 128 डेसिबलपर्यंत पोहचली होती.

कार्तिकने अर्शदीप सिंगला शेवटच्या षटकात धावांचा पाठलाग करताना षटकार मारला होता. त्यावेळी आरसीबीच्या प्रेक्षकांनी या षटकाराचे जोरदार सेलिब्रेशन केलं होतं.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.