IPL 2022: एमएस धोनीचा 51 वा षटकार; जडेजा ने ठोकला सलाम

एमएस धोनीने शेवटी दाखवून दिले आहे की त्याला जगातील सर्वोत्तम फिनिशर का म्हटले जाते
ms dhoni gives csk victory
ms dhoni gives csk victory sakal
Updated on

IPL 2022: एमएस धोनीने शेवटी दाखवून दिले आहे की त्याला जगातील सर्वोत्तम फिनिशर का म्हटले जाते. 20 व्या षटकात 4 चेंडूत 16 धावा करून, त्याने मुंबई विरुद्वच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला एक रोमांचक विजय मिळवून दिला. धोनीने इंडियन प्रीमियर लीगचा 15वा हंगाम सुरू होण्यापूर्वी सीएसकेचे कर्णधारपद सोडले. तेव्हा तो पूर्वीसारखे परफॉर्म करू शकत नाही, असे बोलले जात होते. या कारणामुळे त्याने रवींद्र जडेजाकडे ही जबाबदारी दिल.

मात्र त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 13 चेंडूत नाबाद 28 धावात 3 चौकार आणि 1 षटकार मारून संघाला मोठा विजय मिळवून दिला. मुंबईचा हा सलग 7वा पराभव आहे. त्याचवेळी चेन्नईचा दुसरा विजय. मुंबईने प्रथम खेळताना 7 गडी 155 धावा केल्या होत्या. चेन्नईने 7 विकेट्सवर 156 धावा करून सामना जिंकला. विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावा करायच्या होत्या. जयदेव उनाडकटच्या चेंडूवर धोनीने चौकार मारला.(MS Dhoni Gives CSK Victory)

ms dhoni gives csk victory
ओल्ड धोनीचा गोल्ड फिनिश; रोहितच्या पदरी सातवा पराभव

सीएसकेला सामन्याच्या शेवटच्या षटकात विजयासाठी 17 धावा करायच्या होत्या. डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने पहिल्याच चेंडूवर प्रिटोरियसला बाद करून मुंबईचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चेंडूवर ड्वेन ब्राव्होने एक धाव घेतली. आता CSK ला 4 चेंडूत 16 धावा करायच्या होत्या. धोनीने लाँग ऑफवर तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. आयपीएलच्या इतिहासातील 20व्या षटकातील त्याचा हा 51वा षटकार होता. 20 व्या षटकात त्याच्यापेक्षा जास्त षटकार इतर कोणत्याही फलंदाजाला मारता आलेला नाही. चौथ्या चेंडूवर त्याने चौकार मारला. 5व्या चेंडूवर 2 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर त्याने शॉर्ट फाईन लेगवर चौकार मारून विजय मिळवून दिला.

ms dhoni gives csk victory
Video : जर्सी क्रमांक 7 अन् मुंबईची सर्वात खराब कामगिरी; रोहितने पकडलं डोकं

कर्णधार म्हणून रवींद्र जडेजाचा आयपीएलमधला हा दुसरा विजय ठरला आहे. सामना संपल्यानंतर त्याने मैदानावरच धोनीला सलाम केला. एवढेच नाही तर संपूर्ण टीमने धोनीला मिठी मारली. सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने 19 धावांत 3 बळी घेत सामनावीर ठरला. त्याचा हा आयपीएलचा डेब्यू सीझन आहे. गेल्या वर्षी तो आरसीबीचा नेट बॉलर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.