IPL 2023: चेन्नईच्या विजयानंतर धोनीने दिला कर्णधारपद सोडण्याचा इशारा! Video

IPL 2023 | MS Dhoni | Cricket News in Marathi
IPL 2023 | MS Dhoni | Cricket News in Marathi
Updated on

IPL 2023 MS Dhoni : घरच्या मैदानावर खेळताना चेन्नई सुपरकिंग्जने यंदाच्या आयपीएलमध्ये आपले गुणांचे खाते उघडताना लखनौ सुपरजायंट्स संघाला 12 धावांनी नमवले. टी-20 सामन्यात क्रिकेट मध्ये चाहत्यांना जे काही लागते ते या सामन्यात पाहायला मिळाले. धावांचा पाऊस... मॅचच्या टर्निंग पॉईंटला विकेट.... सोबतच काही उत्कृष्ट खेळी आणि धोनीचे षटकारही पाहायला मिळाले. पण, विजयानंतरही टाळ्या वाजवण्याऐवजी CSK कर्णधार एमएस धोनी आपल्या गोलंदाजांना इशारा देताना दिसला.

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर चेन्नईने 20 षटकांत 7 बाद 217 धावा उभारल्या. यानंतर त्यांनी लखनौला 20 षटकांत 7 बाद 205 धावांवर रोखले. मोईन अलीने 4 बळी घेत चेन्नईच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली. यासह चेन्नईने गुणांचे खातेही उघडले.

IPL 2023 | MS Dhoni | Cricket News in Marathi
IPL 2023 : हा तर अन्याय! मोईन अली नाही तर ... 'हा' खेळाडू होता 'मॅन ऑफ द मॅच'चा खरा दावेदार

आता विजयानंतरही कर्णधार धोनीने आपल्या गोलंदाजांवर निशाणा साधला, त्यामुळे साहजिकच प्रकरण गंभीर झाले असावे. वास्तविक लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात सीएसकेच्या वेगवान गोलंदाजांनी केलेले काम टी-20 क्रिकेटमधील गुन्ह्यापेक्षा कमी नाही. 20 षटकांच्या सामन्यात त्याने 16 अतिरिक्त चेंडू टाकले, ज्यामुळे एमएस धोनी नाराज झाला.

चेन्नईच्या गोलंदाजांनी लखनौ संघाविरुद्ध एकूण 16 अतिरिक्त चेंडू टाकले, ज्यात 13 वाइड आणि 3 नो बॉल होते. सामन्यात संघाच्या विजयानंतरही त्याच्या संघाची ही कमजोरी धोनीच्या नजरेतून लपून राहू शकली नाही. यामुळेच त्याने सामन्यानंतर गोलंदाजांना आपल्या शैलीत इशारा दिला.

IPL 2023 | MS Dhoni | Cricket News in Marathi
IPL 2023 : "गोलंदाजांना ही दुसरी वार्निंग त्यानंतर मी…" विजयानंतर MS धोनी खेळाडूंवर भडकला

एमएस धोनी म्हणाला, गोलंदाजांना वाईड आणि नो बॉल कमी करावे लागतील. त्यांच्यासाठी हा माझा दुसरा इशारा आहे. अन्यथा नंतर तुम्हाला दुसऱ्या कर्णधाराच्या हाताखाली खेळायला तयार राहावे लागेल.

CSK कडून तुषार देशपांडेने सर्वाधिक वाइड आणि नो बॉल टाकले आहेत. IPL 2023च्या पहिल्या प्रइम्पॅक्ट प्लेअरने 4 वाईड आणि 3 नो बॉल टाकले आहेत. याशिवाय दीपक चहरने 5, हंगरगेकरने 3, तर मोईन अलीने 1 वाईड फेकले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()