MI vs CSK IPL 2024 : धोनीच्या 3 षटकारांनी हादरलं वानखेडे..., कोण ठरला मुंबई इंडियन्सच्या पराभवाचा सर्वात मोठा व्हिलन?

रविवारी झालेल्या हाय व्होल्टेज आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला.
IPL 2024 MI vs CSK MS Dhoni
IPL 2024 MI vs CSK MS Dhoni News Marathisakal
Updated on

IPL 2024 MI vs CSK MS Dhoni : रोहित शर्माच्या नाबाद शतकानंतरही मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोहित शर्माने 63 चेंडूत 105 धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 5 षटकार ठोकले. चेन्नई सुपर किंग्जच्या या विजयाचा खरा हिरो होता 42 वर्षीय अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी.

IPL 2024 MI vs CSK MS Dhoni
MI vs CSK Live Score IPL 2024 : रोहितचा शतकी धडाका तरी विजय मात्र चेन्नईचा

जर आपण सामन्याच्या सर्वात मोठ्या टर्निंग पॉइंटबद्दल बोललो तर, महेंद्रसिंग धोनीची ती छोटीशी नाबाद खेळी. महेंद्रसिंग धोनीने 4 चेंडूत 20 धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान महेंद्रसिंग धोनीने हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकात सलग 3 षटकार ठोकले. महेंद्रसिंग धोनीचा स्ट्राईक रेटही या काळात 500 राहिला. महेंद्रसिंग धोनीच्या या 20 धावांच्या खेळीने दोन्ही संघांमध्ये सर्वात मोठा फरक निर्माण केला.

IPL 2024 MI vs CSK MS Dhoni
MS Dhoni : ...त्या 20 धावा! विजय धोनीचा की पराभव हार्दिकचा?

कोण ठरला मुंबई इंडियन्सच्या पराभवाचा सर्वात मोठा व्हिलन?

चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्स विरुद्धचा हा सामना 20 धावांच्या फरकाने जिंकला. धोनीने 20 धावांची ही इनिंग खेळली नसती तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या स्वतःच्याच संघाच्या पराभवाचा सर्वात मोठा खलनायक ठरला. चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याने 26 धावा दिल्या.

हार्दिक पांड्यालाही फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. हार्दिक पांड्या 6 चेंडूत 2 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने शेवटचे षटक स्वत: धोनीला टाकले नसते आणि ते दुसऱ्या स्पेशालिस्ट गोलंदाजाला दिले असते तर कदाचित तो वाचला असता.

चेन्नईच्या 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रोहितच्या नाबाद 105 धावांच्या खेळीसमोर मथिसा पाथिरानाच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई इंडियन्स संघ 6 विकेट्सवर केवळ 186 धावाच करू शकला.

IPL 2024 MI vs CSK MS Dhoni
MS Dhoni MI vs CSK : 6,6,6,2... तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं! धोनीची विक्रम करण्याची स्टाईलच भारी

मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी कमजोरी

अष्टपैलू हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये अद्याप त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला नाही. त्याने आतापर्यंत 6 सामन्यात 26.20 च्या सरासरीने आणि 145.56 च्या स्ट्राईक रेटने 131 धावा केल्या आहेत.

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम स्कोअर 39 धावा आहे. आणि चालू हंगामात त्याला केवळ 3 विकेट्स मिळाल्या आहेत. हार्दिक पांड्याने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत केलेल्या धावांपेक्षा गोलंदाजीत जास्त धावा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.