IPL 2024 : 'भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार....', MS धोनीच्या कर्णधारपदावर पुन्हा बोलला गंभीर

Gautam Gambhir on MS Dhoni : सध्या भारतात आयपीएल 2024 चा धमाका सुरू आहे. ज्यामध्ये आज 22 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे.
Gautam Gambhir on MS Dhoni
Gautam Gambhir on MS Dhoni News Marathisakal
Updated on

Gautam Gambhir on MS Dhoni Video : सध्या भारतात आयपीएल 2024 चा धमाका सुरू आहे. ज्यामध्ये आज 22 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. पण या सामन्याआधी केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीरने महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. त्याने सांगितले की धोनी हा जगातील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

Gautam Gambhir on MS Dhoni
Mumbai Indians : पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये झालं तरी काय? व्हिडिओ होतोय व्हायरल

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 वर्ल्ड कप 2007, एकदिवसीय वर्ल्ड कप 2011 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकली आहे. जगातील यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीच्या नावाचा समावेश होतो. तो सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे.

या हंगामाच्या सुरुवातीला त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. आता त्यांच्या जागी ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करत आहेत. धोनीने आयपीएलमध्ये 226 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून त्याच्या संघाने 133 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Gautam Gambhir on MS Dhoni
IPL 2024 Delhi Capitals : चार पराभवानंतर दिल्ली संघाने घेतला मोठा निर्णय! 'या' खेळाडूची वाइल्ड कार्ड एन्ट्री

कोलकाता विरुद्ध चेन्नई सामन्यापूर्वी गौतम गंभीर म्हणाला की, एमएस हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, मला वाटत नाही की कोणीही त्यापर्यंत जाईल. त्याने भारताला तीन वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली आहे.

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहेत. यासोबत कोलकाता आयपीएलच्या 17 व्या हंगामात संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे. आज चेन्नईविरुद्धच्या विजयाकडे संघाची नजर असेल.

गंभीर पुढे म्हणाला, "तो रणनीतीच्या बाबतीत खूप चांगला आहे. त्याला स्पिनर्सवर नियंत्रण कसे ठेवायचे, कोणाविरुद्ध क्षेत्ररक्षण कसे करायचे हे त्याला माहीत होते आणि त्याने कधीही हार मानली नाही. तो 6 किंवा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करायचा.. आणि तो जोपर्यंत होता तोपर्यंत आम्हाला माहित होते की तो खेळ पूर्ण करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.