MS Dhoni Lap Of Honor For Fans : चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सनी पराभव करत आयपीएल 2024 च्या प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. चेन्नईचा हा होम ग्राऊंडवरचा 50 वा विजय होता. या विजयानंतर होम ग्राऊंड चेपॉकमधील हंगामाच्या लीग स्टेजमधील शेवटचा सामना खेळणाऱ्या चेन्नईने सामन्यानंतर चाहत्यांसाठी लॅप ऑफ ऑनर आयोजित केला होता.
यावेळी एमएस धोनीने पिवळा बॉल टेनिस रॅकेटने प्रेक्षकांच्या दिशेने मारात एकप्रकारे चाहत्यांसाठी फटकेबाजी केली. याचबरोबर सीएसकेने आपल्या संपूर्ण संघाला मेडल देत त्यांचा सन्मान केला.
आजच्या सामन्यात धोनी पॅड बांधून तयार होता. मात्र त्याला फलंदाजीला येता आलं नाही. ऋतुराज आणि रिझवीनेच सामना संपवला. मात्र सामन्यापूर्वी धोनी निवृत्ती जाहीर करणार का अशी शक्यता सीएसकेच्या पोस्टनंतर बोलून दाखवली जात होती. मात्र आता सीएसकेच्या प्ले ऑफच्या आशा वाढल्या असल्याने ते पुन्हा चेपॉक स्टेडियमवर खेळण्याची शक्यता आहे.
रविवारी झालेल्या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर पाच गडी राखून शानदार विजय मिळवून आयपीएल प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या त्यांच्या संधी वाढवल्या. CSK ने आव्हानात्मक खेळपट्टीवर 142 धावांच्या माफक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत 18.2 षटकात 5 बाद 145 धावा केल्या. कर्णधार रुतुराज गायकवाडने निर्णायक भूमिका बजावली, त्याने 41 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या, त्याला धडाकेबाज समीर रिझवीच्या नाबाद 15 धावांची साथ मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.