IPL 2024 : MS धोनीमुळे CSK टेन्शनमध्ये! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर दिसला लंगडताना; Video Viral

MS Dhoni Video Viral IPL 2024 : महेंद्रसिंग धोनी हे फक्त एका खेळाडूचे नाव नाही तर भावना आहे. आयपीएल 2024 मध्ये धोनीला पाहण्यासाठी चाहते अनेक किलोमीटरचा प्रवास करत आहेत.
ms dhoni limping after csk vs dc match ipl 2024
ms dhoni limping after csk vs dc match ipl 2024sakal
Updated on

MS Dhoni Video Viral IPL 2024 : महेंद्रसिंग धोनी हे फक्त एका खेळाडूचे नाव नाही तर भावना आहे. आयपीएल 2024 मध्ये धोनीला पाहण्यासाठी चाहते अनेक किलोमीटरचा प्रवास करत आहेत.

पहिल्या दोन सामन्यात धोनी फलंदाजीला आला नव्हता, पण दिल्लीविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने चाहत्यांचा दिवस बनवला. त्याने पहिल्याच चेंडूपासून दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. या धमाकेदार खेळीनंतर धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज टेन्शनमध्ये आली आहे.

ms dhoni limping after csk vs dc match ipl 2024
IPL 2024 : हार्दिक पांड्याविरुद्ध बोलाल तर होणार मोठी कारवाई... मुंबईने लागू केली नवीन नियमावली

आता रविवारी म्हणजेच 31 मार्च रोजी सीएसकेचा दिल्लीने 20 धावांनी पराभव केला आणि त्यानंतर धोनी विझागमध्ये लंगडताना चालताना दिसला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनी ड्रेसिंग रूममध्ये जाताना लंगडा होताना दिसत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर धोनी पूर्णपणे फिट आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण धोनीकडे पुढच्या सामन्यापूर्वी काही वेळ आहे. कारण सीएसके आता 5 एप्रिल रोजी हैदराबाद विरुद्ध पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली पुढील सामना खेळायचा आहे.

ms dhoni limping after csk vs dc match ipl 2024
Jos Buttler : राजस्थान रॉयल्सच्या स्टार खेळाडूने चालू IPL मध्येच अचानक केली मोठी घोषणा

धोनीला या हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने केवळ संघासाठी विकेटकीपिंग केले, परंतु त्याने विझागमध्ये दिल्लीविरुद्ध फलंदाजी केली आणि आपल्या खेळाने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या धोनीने 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या, पण या सामन्यात सीएसके विजयाचे लक्ष्य गाठण्यात फारच कमी पडले.

या सामन्यातील आपल्या खेळीच्या जोरावर धोनीने आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून 5000 धावाही पूर्ण केल्या आणि टी-20 फॉरमॅटमध्ये विकेटच्या मागे 300 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.