महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या 17 व्या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेची कमान सोपवण्यात आली आहे. धोनीच्या अचानक कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
आता याप्रकरणी युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलचे वक्तव्यही समोर आले आहे. गेलने सांगितले की, धोनी कदाचित आयपीएलच्या या हंगामात मध्यंतरी ब्रेक घेईल, त्यामुळे या अनुभवी खेळाडूने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल एका मुलाखतीदरम्यान म्हणाला की, धोनी कदाचित सर्व सामने खेळणार नाही. धोनी स्पर्धेदरम्यान थोडा ब्रेक घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असावा. पण एक गोष्ट निश्चित आहे की धोनी या मोसमात चांगली कामगिरी करेल आणि त्याबद्दल कोणालाही काळजी करण्याची गरज नाही.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि CSK यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यादरम्यान गेलचे हे वक्तव्य आले. गेलच्या आधीही अनेक खेळाडूंनी धोनीचे कर्णधारपद सोडण्याबाबत मत व्यक्त केले आहे.
प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाही धोनी आयपीएलच्या चालू हंगामानंतर या स्पर्धेतून निवृत्त होण्याची दाट शक्यता आहे. धोनी 2008 पासून आयपीएलशी जोडला गेला आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी लवकरच आयपीएलला अलविदा करणार असल्याच्या चर्चेला आता अधिक हवा मिळाली आहे.
मात्र, आरसीबीविरुद्धच्या १७व्या मोसमातील पहिल्या सामन्यात धोनी मैदानावर नेहमीसारखाच दिसत होता. धोनीने विकेटच्या मागे तोच वेग दाखवला ज्यासाठी तो ओळखला जातो. आरसीबीच्या डावातील शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धोनीने अनुज रावतला रन आऊट केले, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाची कमान ऋतुराज गायकवाडकदे देण्यात आली. कर्णधार म्हणून ऋतुराजने पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावली होती. या सामन्यात फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघाला वेगवान सुरुवात करून दिली. त्यावेळी या सामन्यात आरसीबी मोठी धावसंख्या करेल असे वाटत होते, मात्र मुस्तफिझूर रहमानने डुप्लेसिसला बाद करून सीएसकेला पहिले यश मिळवून दिले आणि यानंतर आरसीबीची लय बिघडली. चेन्नईने 174 धावांवर सहज विजय मिळवला आणि ऋतुराजच्या नेतृत्वाखाली सीएसकेने विजयाने सुरुवात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.