MS Dhoni CSK Won IPL : चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्स राखून पराभव केला. पावसामुळे 15 षटकात 171 धावा चेस करण्याचे टार्गेट धोनीच्या चेन्नईसमोर होते. मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर चेन्नईच्या पोरांनी हे शिवधनुष्य पेलले अन् आपल्या लाडक्या थलाला पाचव्या आयपीएल विजेतेपदाचे गोड गिफ्ट दिले.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा सुरू होती. मात्र अखेरच्या सामन्यात धोनीने पुन्हा एखदा आपण पुढचा हंगाम खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले. सामना झाल्यावर बक्षीस वितरण सोहळ्यावेळी सलामोचक हर्षा भोगले यांनी धोनीला पहिलाच प्रश्न निवृत्तीबाबत केला.
धोनीने हर्षा भोगलेंच्या या प्रश्नावर थेट षटकार मारला, धोनी म्हणाला की, 'तुम्हाला याचं उत्तर हवं आहे? सध्याची परिस्थिती पाहता ही निवृत्तीची अत्यंत चांगली वेळ आहे. मात्र जेवढे प्रेम मला मिळाले आहे. ते घेऊन इथून जाणे सोपं आहे. मात्र पुढचे 9 महिने हार्ड वर्क करत पुढचा अजून एक हंगाम खेळणे अवघड काम आहे.'
यंदाच्या आयपीएलमध्ये सर्व मैदानातून मिळालेल्या पाठिंब्याबाबत धोनी म्हणाला की, 'हे माझ्यासाठी एक गिफ्ट होते. तुम्ही नक्कीच भावनिक होता. चेन्नईच्या पहिल्या सामन्यात सर्वजण माझ्या नावाचा जयघोष करत होते. माझे डोळे पाणवले होते. मी डगआऊटमध्ये काही काळ शांत बसून होतो. त्यानंतर मला जाणीव झाली की मला हा क्षण एन्जॉ केला पाहिजे. मला असे वाटते की मी जसा आहे त्यांना तसा आवडतो. माझे पाय अजून जमिनीवर आहेत. मी जसा नाही तसा दिसण्याचा प्रयत्न करत नाही. मी गोष्टी सोप्या ठेवतो.'
पाचव्या विजेतेपदाबाबत धोनी म्हणाला की, 'प्रत्येक आयपीएल ट्रॉफी ही विशेष असते. मात्र आयपीएलची एक खास गोष्ट आहे तुम्ही आयपीएलमधील प्रत्येक अटीतटीच्या सामन्यासाठी तयार रहायला हवं. आज आमच्याकडून काही चुका झाल्या. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. मात्र आमच्या फलंदाजी विभागाने तो सगळा दबाव झेलला.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.