चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) सनराईजर्स हैदराबादचा पराभव करत आपली गाडी पुन्हा विजयी ट्रॅकवर आणली. या सामन्यात चेन्नईने नेतृत्व पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीकडे (MS Dhoni) आले. धोनीने नेतृत्वाची (Captain) धुरा हातात घेताच चेन्नईच्या कामगिरीत बरीच सुधारणा झाली. सामना झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) अचानक कर्णधारपद सोडण्याचा का निर्णय घेतला याचा खुलासा केला. यावेळी त्याने कर्णधाराला चमच्याने भरवणे प्रत्येकवेळी शक्य होत नाही असे वक्तव्य केले .
सामना झाल्यावर धोनी म्हणाला की, 'प्रत्येकवेळी कर्णधाराला चमच्यानं भरवण्यांन (Spoon Feeding) शक्य होत नाही. मैदानावर तुम्हाला ते अवघड निर्णय घ्यावे लागतात. याचबरोबर त्या निर्णयांची जबाबदारी देखील घ्यावी लागले.'
धोनी पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी तुम्ही कर्णधार होता. त्यावेळी तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते याचबरोबर तुमचा खेळही तुम्हाला सांभाळावा लागतो. मात्र त्याच्या सोबात ( रविंद्र जडेजा ) झालं असं की त्याचा मेंदू खूपच जास्त काम करत होता. तुम्हाला तुमच्या मेंदूवर नियंत्रण मिळवणं खूप कठिण जाते. तुम्ही जास्तच विचार करत असता. कोणते कॉम्बिनेशन घेऊन खेळायला हवे, कोणाला कोणत्या स्थितीत गोलंदाजीला आणले पाहिजे. असे विचार सतत डोक्यात सुरू असतात. ते कधी थांबत नाहीत. जर एखादा व्यक्ती डोळे झाकले तरी तणावमुक्तच होऊ शकत नसेल, त्याला झोप हवी असते मात्र त्याचा मेंदू सतत काम करत असतो. मला वाटते की याचाच परिणाम त्याच्या खेळावर देखील झाला. मला संघात जडेजा एक गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून हवा आहे.'
सीएसकेच्या कॅम्पमध्ये असा एक विचार होता की माजी कर्णधार धोनी हा त्याच्या वारसदाराला तयार करेल. जडेजाला धोनीप्रती खूप आदर आहे. तो धोनीकडून शिकण्यासाठी कोणताही संकोच करणार नाही. मात्र जडेजाची यंदाच्या हंगामात ऑलराऊंडर म्हणून कामगिरी ही 8 सामन्यात 112 धावा 5 विकेट अशी सुमार राहिलेली आहे. त्यामुळेच त्याला कर्णधारपदाबाबत पुन्हा एकदा विचार करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.