MS Dhoni IPL 2023 : देशभरातून चाहत्यांच्या मिळालेल्या प्रेम आणि आदराखातर मी येथे आहे. याच प्रेमामुळे आणखी एका मोसमात खेळण्याचे बळ मिळत आहे; परंतु शरीर किती साथ देते, याचा अंदाज घेतल्यानंतर पुढे काय करायचे, हे ठरवेन, अशा शब्दात अप्रत्यक्षपणे का होईना, महेंद्रसिंह धोनीने किमान आणखी एका आयपीएलमध्ये खेळण्याचा वादा केला.
रवींद्र जडेजाने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या चौकारामुळे चेन्नईचा सनसनाटी विजय झाला. धोनीच्या चेन्नई संघाने पाचव्यांदा आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवले. रविवारी मध्यरात्री हा थरार रंगत होता; परंतु धोनीच्या चाहत्यांचे लक्ष त्याच्याकडून येणाऱ्या वक्तव्यावर होते.
सामना संपल्यानंतर बक्षीस वितरणासाठी बराच वेळ लागला. पहाटे अडीच वाजत असताना धोनीच्या हाती विजेतेपदाचा धनादेश सुपूर्द करण्यात आल्यानंतर निवेदक हर्षा भोगले यांनी संभाषणाची सुरुवातच मागे केलेल्या वक्तव्यापासून केली. पण प्रश्नाचा रोख निवृत्तीबाबतचा होता.
सर्वांचा आदर राखत धोनीने आपल्या भवितव्याबाबत थेटच उत्तर दिले...
‘खरे तर निवृत्ती जाहीर करण्याची ही योग्य वेळ आणि अचूक क्षण आहे; पण तमाम प्रेक्षकांनी दिलेले प्रेम आणि आदर यामुळे मी येथे आहे आणि खेळत आहे. सर्वांना धन्यवाद देऊन निरोप घेऊ शकलो असतो; पण चाहत्यांनी दिलेल्या प्रेमामुळे पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची ऊर्जा मिळत आहे. अर्थात हे सोपे नाही. फार मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. शरीर किती साथ देते, याचेही अवलोकन करावे लागणार आहे. त्यासाठी ६-७ महिन्यांचा वेळ आहे. मी माझ्याकडून सर्वस्व दिले आहे.’
अंबाती रायडूचा सन्मान
विजेतेपदाचा करंडक साधारणतः कर्णधार स्वीकारत असतो. या वेळीही जय शहा आणि रॉजर बिन्नी धोनीला करंडक देत होते; परंतु धोनीने आयपीएलमधून निवृत्त होत असलेल्या आपल्या संघातील अंबाती रायडू आणि मॅच विनर रवींद्र जडेजाला बोलवले आणि त्यांना करंडक स्वीकारू दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.