पुढचा आयपीएल हंगाम खेळणार? खुद्द धोनीनेच केला खुलासा

MS Dhoni Statement About Playing Next IPL Season
MS Dhoni Statement About Playing Next IPL SeasonESAKAL
Updated on

चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मुंबई विरूद्धचा सामना पाच विकेट्सनी गमावला आणि त्यांचे यंदाच्या हंगामात प्ले ऑफमध्ये जाण्याच्या उरल्या सुरल्या आशा देखील मंदावल्या. यंदाचा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी फारसा चांगला गेला नाही. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 सामन्यात त्यांना फक्त 4 विजयच मिळवता आले आहेत. चेन्नईने हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधीच संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडून (Mahendra Singh Dhoni) रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आले. हा धक्का ना चेन्नईचे चाहते, ना संघ, ना खुद्द जडेजा सहन करू शकला. जडेजाच्या नेतृत्वात चेन्नईने सलग चार सामने गमावले. दरम्यान, हंगामाच्या मध्यावरच पुन्हा सीएसकेने आपला कर्णधार बदलत एमएस धोनीकडे कर्णधारपद सोपवले. (MS Dhoni Statement About Playing Next IPL Season)

MS Dhoni Statement About Playing Next IPL Season
तिलक वर्मा लवकरच MI चा कॅप्टन होणार, दिग्गज खेळाडूचा खुलासा

ज्यावेळी चेन्नईचे कर्णधारपद धोनीकडून रविंद्र जडेजाकडे सोपवले होते. त्यावेळी धोनीचा हा बहुदा शेवटचा हंगाम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र पुन्हा धोनीकडे नेतृत्व आले. धोनी कर्णधार झाल्या झाल्या चेन्नईच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे जाणवले. मात्र मुंबईविरूद्धच्या सामन्यात त्यांचे येरे माझ्या मागल्या सुरूच राहिले. चेन्नई आता प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर गेल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना पुढच्या हंगामाचे वेध लागले आहेत. पुढच्या हंगामात महेंद्रसिंह धोनी चेन्नईकडून खेळणार की नाही याची उत्सुकताही चाहत्यांच्या मनात आहे.

MS Dhoni Statement About Playing Next IPL Season
आमच्यासाठी काही निर्णय दुर्दैवी ठरले, CSK च्या हेड कोचने व्यक्त केली खंत

दरम्यान, खुद्द धोनीनेच मुंबई विरूद्धच्या सामन्यानंतर याबाबची संकेत दिले. तो म्हणाला की, 'आम्ही या हंगामातून काही सकारात्मक बाबी घेऊन पुढच्या हंगामात जात आहोत. पण, जी काही पोकळी निर्माण झाली आहे ती भरण्याचा प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय जी गळती सुरू झाली आहे ती थांबणार नाही.' धोनी मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंह या दोन वेगावान गोलंदाजाबद्दल बोलताना म्हणाला की, 'हे दोन्ही वेगवान गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत ही एक सकारात्मक बाब आहे. तुम्ही हेही विसरून चालणार नाही की, पुढच्या हंगामात दोन अजून वेगावान गोलंदाज संघात असणार आहेत. तसेच अजून काही खेळाडू संधी मिळण्याची वाट पाहत आहेत.'

गेल्या वर्षी महेंद्रसिंह धोनीने सीएसकेच्या एका कार्यक्रमात तो कारकिर्दीतील शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार असे म्हणाला होता. 'मी कायम माझ्या क्रिकेटचे नियोजन केले आहे. मी माझा भारताकडून खेळलेला शेवटचा वनडे सामना हा रांचीत होता. मला आशा आहे की टी 20 चा शेवटचा सामना हा चेन्नईत असेल. मग तो पुढच्या वर्षी असेल किंवा पाच वर्षांनी असेल मला माहिती नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.