MS Dhoni IPL : टाईम ट्रॅव्हल! 2040 चा धोनी 2023 मध्ये अवतरला; Video होतोय व्हायरल

MS Dhoni IPL Viral Video
MS Dhoni IPL Viral Videoesakal
Updated on

MS Dhoni IPL Viral Video : चेन्नई सुपर किंग्जचा थलायवा महेंद्रसिंह धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याची कुणकुण चाहत्यांना लागली आहे. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार कोणत्याही मैदानावर गेला तरी ते मैदान चेन्नईच्या पिवळ्या रंगात रंगून जात आहे. धोनीने 2020 च्या 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. मात्र त्यानंतर तो आयपीएलमध्ये आपल्या चाहत्यांना आपली झलक दाखवत राहिला. आता ही झलक देखील यंदाच्या हंगामानंतर बंद होण्याची शक्यता आहे.

MS Dhoni IPL Viral Video
Virat Kohli Sachin Tendulkar : दिग्गजांच्या कानगोष्टी! सामन्यापूर्वी विराट - सचिनची भेट अन् तर्क वितर्कांना उधाण

दरम्यान, धोनीच्या उपस्थितीत पिवळ्या रंगात रंगून गेलेल्या स्टेडियममधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आयपीएलच्या 41 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज एकमेकांना भिडले. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चक्क वयस्कर धोनी प्रेक्षक गॅलरीत बसून सामना पाहत आहे असा भास होतोय. हा भासच होता.

MS Dhoni IPL Viral Video
Team India : BCCI अन् कर्णधार रोहितने संपवली 'या' 2 दिग्गज खेळाडूंची कारकीर्द!

मात्र इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओला एका चाहत्याने कॅप्शन दिले की, 'भावांनो 2040 मध्ये धोनी सामना पाहत आहे.' या व्हिडिओच्या खाली एक चाहत्याने कमेंट केली की 'टाईम ट्रॅव्हल हे शक्य आहे. सध्या जरी हा विनोदाचा भाग असला तरी खरं काय आहे हे पाण्यासाठी आपल्याला 2040 पर्यंत थांबावं लागेल.'

धोनी आयपीएलच्या या हंगामानंतर निवृत्त होणार की नाही याबाबत काहीच अधिकृत माहिती नसलं तरी धोनीचा सीएसकेमधील जुना सहकारी सुरेश रैनाने सांगितले की, धोनीने त्याला त्याच्या निवृत्तीबाबत सांगितले आहे. चाहत्यांसाठी ही एक बातमी आहे जी ते ऐकू इच्छितात. जिओ सिनेमावर बोलताना रैनाने सांगितले की, धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल त्याला सांगितले आहे. मी ट्रॉफी जिंकल्यानंतर एक वर्ष अजून खेळणार आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.