MS Dhoni Injury Update : MS धोनीला नक्की झाले तरी काय... उपचारासाठी जाणार लंडनला?

MS Dhoni Injury Update : चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2024 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे.
MS Dhoni Injury Update
MS Dhoni Injury Updatesakal
Updated on

MS Dhoni Injury Update: चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2024 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. ही तिसरी वेळ आहे जेव्हा सीएसके संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. या पराभवानंतर 42 वर्षीय महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे. एमएस धोनीचा हा आयपीएलमधील शेवटचा सीझन होता, असे मानले जाते. पण या सगळ्या दरम्यान चेन्नई संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.

MS Dhoni Injury Update
Gautam Gambhir : 'मी त्यांचे पाय धरले नाही म्हणून...' गौतमच्या गंभीर वक्तव्याने खळबळ

एमएस धोनी आयपीएल 2024 दरम्यान दुखापतीशी झुंजताना दिसला होता. मात्र असे असतानाही तो सर्व सामने खेळला. धोनी या हंगामात स्नायूच्या दुखापतीने त्रस्त होता. अशा परिस्थितीत धोनी पुढच्या हंगामात खेळणार की नाही याबाबत ताज्या घडामोडींची माहिती असलेल्या एका सूत्राने महत्त्वाची माहिती दिली आहे.

या सूत्राने आयएएनएसला सांगितले की धोनी लंडनला जाऊ शकतो, जिथे त्याच्या स्नायूंच्या दुखापतीच्या उपचारासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतरच धोनी निवृत्तीचा निर्णय घेईल.

MS Dhoni Injury Update
Star Sports Hits Back Rohit Sharma : 'हिटमॅन' रोहित शर्माच्या आरोपांवर स्टार स्पोर्ट्सने केला पलटवार; म्हणाले...

चेन्नईने लीग स्टेजमधील शेवटचा सामना आरसीबीविरुद्ध खेळला. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा होता. ज्यामध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने 20 षटकात 218 धावा केल्या. 219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा संघ 20 षटकात केवळ 191 धावाच करू शकला आणि या सामन्यात त्यांना 27 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.