MS Dhoni MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी आज वानखेडेवर आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळणार आहे. धोनी हा शेवटचा वानखेडेवर खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर त्याचा हा शेवटचा हंगाम असेल तर वानखेडेवरचा हा त्याचा शेवटचा आयपीएल सामना असेल.
आजच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी एक मोठा कारनामा करण्याची देखील शक्यता आहे. मुंबई अन् चेन्नईचा सामना हा आयपीएलमधील एल क्लासिको सामना म्हणून ओळखला जातो. हा सामना धोनी खास करण्याची शक्यता आहे. तो चेन्नईकडून 5000 धावा करण्यापासून फक्त 4 धावा दूर आहे. जर धोनीला आजच्या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली अन् त्यानं 4 धावा केल्या तर तो सीएसकेकडून 5000 धावा करणारा सुरेश रैना नंतरचा दुसरा फलंदाज ठरणार आहे.
सुरेश रैना - 200 सामने, 5529 धावा
महेंद्रसिंह धोनी - 249 सामने, 4996 धावा
फाफ ड्युप्लेसिस - 100 सामने, 2932 धावा
मायकल हसी - 64 सामने, 2213 धावा
मुरली विजय - 89 सामने, 2205 धावा
ऋतुराज गायकवाड, रचिन रविंद्र, अजिंक्य रहाणे, डॅरेल मिचेल, समीर रझवी, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, शार्दुल ठाकूर, मस्तफिजूर रहमान, तुषार देशपांडे, महीश तिक्षाणा (इम्पॅक्ट प्लेअर - शिवम दुबे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.