MI vs CSK, IPL: टाईम-आऊट न दिल्याने पोलार्डने घातला अंपायरशी वाद; पण नियम काय सांगतो? घ्या जाणून

Mumbai Indians time out controversy: चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात 15 व्या षटकानंतर टाईम-आऊट न दिल्याने कायरन पोलार्ड अंपायरशी वाद घालताना दिसला होता. दरम्यान, याबाबतचा आयपीएलचा नियम काय आहे, जाणून घ्या.
Mumbai Indians time out controversy
Mumbai Indians time out controversy Sakal
Updated on

IPL Time Out Rule: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रविवारी (14 एप्रिल) झालेल्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 20 धावांनी पराभूत केले. दरम्यान, या सामन्यात एक वादही झाल्याचे दिसले.

वानखेडे स्टेडियवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांना टाईम-आऊट घ्यायचा होता, परंतु, त्यांना पंचांनी तो नाकारल्याचे दिसले. ही घटना नक्की या आहे आणि यामागील नियम काय आहेत, हे जाणून घेऊ.

Mumbai Indians time out controversy
सुपरकिंग थाला! षटकारांच्या हॅट्रिकनंतर दिलं चिमुरडीला स्पेशल गिफ्ट.. का होतंय धोनीचं कौतुक ?

झाले असे की चेन्नईने मुंबईसमोर 207 धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळी सलामीला आलेला रोहित शर्मा चांगल्या लयीत खेळत होता. पण तिसरी विकेट गेल्यानंतर त्याला साथ देण्यासाठी 14 षटकात कर्णधार हार्दिक पांड्या फलंदाजीला उतरला.

त्यानंतर 15 व्या षटकातील दोन चेंडू बाकी असतानाच मुंबईचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर आणि फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड आणि फलंदाज टीम डेव्हिड यांनी पंचांना पाहून टाईम-आऊटचा इशारा केला होता.

त्यानंतर 15 व्या षटकानंतर ते टाईम-आऊट झाल्याचं समजून मैदानात जाऊ लागले. परंतु, फोर्थ अंपायरने त्यांना मागे बोलावले. यानंतर पोलार्ड अंपायरवर चिडतानाही दिसला. यानंतर अखेर 16 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर पंचांनी टाईम-आऊटचा इशारा केला.

नियम काय सांगतो?

आयपीएलच्या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणारा संघ 6 ते 9 षटकांदरम्यान टाईम-आऊट घेऊ शकतो, तसेच फलंदाजी करणारा संघ 13 ते 16 षटकांदरम्यान टाईम-आऊट घेऊ शकतो.

परंतु, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आयपीएलच्या प्लेइंग कंडिशन्समधील नियम क्रमांक 11.6.5 नुसार प्रत्येत टाऊम-आऊटबाबतचा निर्णय हा संघाचा कर्णधार किंवा खेळपट्टीवर फलंदाजी करणारे फलंदाज घेऊ शकतात.

म्हणजेच एकतर संघाच्या कर्णधाराने किंवा खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने टाईम-आऊट घेण्याबाबत मैदानावरील पंचांना किंवा फोर्थ अंपायरला कळवणे बंधनकारक आहे. तसेच षटकाच्या शेवटच्या चेंडूपूर्वी याबाबत पंचांना कळवणेही गरजेचे असते.

Mumbai Indians time out controversy
MI vs CSK: पराभवाचं दु:ख! शतकानंतरही मुंबई इंडियन्स हरल्यानंतर रोहितने एकट्यानेच धरली ड्रेसिंग रुमची वाट, Video Viral

जर कर्णधार किंवा फलंदाजांनी टाईम-आऊट घेतला नाही, तर पंच 9 व्या षटकानंतर आणि 16 व्या षटकानंतर अधिकृतपणे टाईम-आऊटचा इशारा करतात. पण त्याआधी जोपर्यंत कर्णधार किंवा फलंदाज पंचांना सांगत नाही, तोपर्यंत पंच टाईम-आऊटचा निर्णय देऊ शकत नाही.

इतकेच नाही, तर या नियमानुसार कर्णधार किंवा खेळपट्टीवरील फलंदाजांव्यतिरिक्त संघाचे प्रतिनिधित्व करणारे दुसरा कोणाच सदस्य टाईम-आऊटची विनंती पंचांना करू शकत नाही.

याच नियमामुळे मुंबई फोर्थ अंपायरने पोलार्ड आणि बाऊचर यांना मागे बोलावले. या टाईम-आऊटची विनंती पंचांकडे हार्दिक पांड्या किंवा रोहित शर्माने करणे अपेक्षित होते, परंतु, त्यांनी ती विनंती केली नसल्याने पंचांनी 15 व्या षटकानंतर मुंबईला टाईम-आऊट दिला नव्हता.

IPL | Time Out Rule
IPL | Time Out RuleScreengrab: https://www.iplt20.com/

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 6 बाद 186 धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.